पुणे

मुलींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे

CD

पुणे, ता. ११ : मुलींना त्यांचे स्वतःचे रक्षण करता यावे, यासाठी जिल्हा परिषदेने पाऊल उचलले आहे. मुलींना ज्युडो कराटे आणि शारीरिक विकासाच्या संदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी खास योजना आखली असून, त्याच्या अंमलबजावणीला आता सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील अडीच हजार मुलींना ज्युडो कराटे आणि सुमारे २७ हजार मुलींना शारीरिक विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
बदलापूरच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेने मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचे ठरवले. आठवी ते दहावीमधील मुलींना स्वसंरक्षणाचे आणि शारीरिक विकासाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही प्रशिक्षणांसाठी खासगी संस्थांची नेमणूक केली असून, त्यासाठी जिल्हा परिषदेने सुमारे जवळपास ५० लाख रुपये खर्च केले आहेत. प्रत्येक तालुक्यातील मुलींची निवड करून ज्युडो कराटेचे ७२ प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात येणार आहे. कराटे प्रशिक्षणाचा वर्ग हा सलग ९० दिवस सुरू असणार आहे. एका प्रशिक्षण वर्गात ३५ मुलींचा समावेश करण्यात आला आहे. हे प्रशिक्षण शाळेच्या आवारातच आयोजित करण्यात येणार आहेत. खासगी संस्थेकडून प्रशिक्षण देत असतानाच प्रशिक्षण व्यवस्थित सुरू आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आणि नियंत्रण ठेवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीकडून शाळेतील एका महिला शिक्षिकेची नेमणूक करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर पर्यवेक्षिका देखील प्रशिक्षणास भेट देऊन सुरळीत सुरू असल्याची खात्री वेळोवेळी करणार आहेत. जिल्हा परिषद एका मुलीसाठी एक हजार रुपये खर्च करत असून, ज्युडो कराटेसाठी २५ लाख रुपये खर्च केले आहेत.


किशोरवयीन २७ हजार मुलींना प्रशिक्षण
पुण्यातील सुमारे २७ हजार किशोरवयीन मुलींसाठी शारीरिक विकासाच्या संदर्भात ६७५ प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहेत. यासाठी २४ लाख ९७ हजार पाचशे रुपये जिल्हा परिषदेने खर्च केले असून, २१ खासगी संस्थांची यासाठी नियुक्ती केली आहे. किशोरवयीन मुलींना पोषण, आहारविषयक दर्जा सुधारावा त्याचप्रमाणे वैयक्तिक स्वच्छता, लैंगिक आरोग्य त्याचबरोबर जीवनकौशल्ये, व्यवसाय कौशल्ये याबाबत प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण वर्ग ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, महाविद्यालये, अंगणवाडी किंवा इतर शासकीय इमारतीमध्ये आयोजित केली जाणार आहेत.

पॉईंटर
ज्युडो कराटेसाठी जि.प.कडून खर्च केलेली रक्कम - २५ लाख रुपये
किशोरवयीन मुलींच्या प्रशिक्षणासाठी जि.प.कडून खर्च केलेली रक्कम - २४ लाख ९७ हजार ५०० रुपये
ज्युडो कराटेसाठी एका मुलीसाठी खर्च - एक हजार रुपये
किशोरवयीन मुलींच्या प्रशिक्षणाच्या एका सत्रासाठी खर्च साधारण - ३७ हजार रुपये.

मुली स्वसंरक्षणासाठी स्वतः सक्षम होणे गरजेचे आहे. त्यांच्यामध्ये स्वसंरक्षणाचा आत्मविश्‍वास निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे, त्यासाठी हे प्रशिक्षण उपयोगी ठरणार आहेत. याशिवाय काही मुली यातून पुढील करिअर म्हणूनही याकडे पाहू शकतात.
- संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

मुलींना स्वसंरक्षणाबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याचा जिल्ह्यातील मुलींना चांगला फायदा होईल, त्याशिवाय किशोरवयीन मुलींचेही प्रशिक्षण वर्ग घेण्यास सुरुवात झाली आहे.
-जामसिंग गिरासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT