पुणे

उन्हाच्या तडाख्याने टँकरवरच भिस्त!

CD

अशोक गव्हाणे : सकाळ वृत्तसेवा
कात्रज, ता. २५ : उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढला असून, जिल्ह्यातील १० तालुक्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जवळपास सव्वादोन लाख लोकसंख्या सध्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढत असून, १७१ टँकरद्वारे जवळपास ५०० खेपांच्या माध्यमांतून १३५ गावांमध्ये २ लाख २८ हजार ३९६ नागरिकांना पाणी पुरवठा सुरू आहे.
याबाबत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून माहिती देण्यात आली की, जिल्ह्यातील वेल्हे, मावळ, मुळशी वगळता उर्वरित तालुक्यांतील गावांना हा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक ७३ टँकर हे पुरंदर तालुक्यासाठी दिले आहेत. तर, सर्वांत कमी इंदापूर आणि खेड प्रत्येकी ४ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. एकूण १७१ टँकरमध्ये १६५ खासगी, तर ६ शासकीय टँकरचा समावेश आहे.

टॅंकरचा पुरवठा दृष्टीक्षेपात
टॅंकरवर अवलंबून असलेली लोकसंख्या- २ लाख २८ हजार ३९६
सुरू केलेल्या टॅंकर- १७१
टॅंकरच्या दिवसातील फेऱ्या- ५००
पुरंदरमध्ये सर्वाधिक टॅंकर- ७३
इंदापूर, खेडमध्ये कमी टॅंकर- ४

जनावरांसाठीही पुरवठा
जिल्ह्यातील १ लाख ६७ हजार ९४ जनावरांनाही टॅंकरद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. यामध्येही सर्वाधिक पुरंदर तालुक्यातील जनावरांचा समावेश आहे. तसेच, बारामती तालुक्यातील सुपे परिसरातील बाधित जनावरांना चांदगुडेवाडीतील विहिरीवरून पाणी पुरविण्यात येते.

पाण्याच्या गरजेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सद्यःस्थितीत चालू असलेल्या टँकरवर पाण्याची गरज भागेल. त्यामुळे आता टँकरची संख्या वाढण्याची शक्यता कमी आहे.
- चंद्रकांत वाघमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

तालुकानिहाय सुरू असलेले टॅंकर
तालुका--टँकरची संख्या--गावे--एकूण लोकसंख्या
आंबेगाव--१८--१८--१३ हजार ९०३
बारामती--२१--२०--३१ हजार ६८७
भोर--९--९--२ हजार २६१
दौंड--९--६--१५ हजार ८३८
हवेली--८--९--९ हजार ४८२
इंदापूर--४--४--७ हजार ५३७
जुन्नर--१४--१६--१८ हजार ४४२
खेड--४--४--७ हजार ५३७
पुरंदर--७३--४६--९६ हजार ६९९
शिरूर--११--३--२५ हजार २९७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीच्या प्रभारीपदी चंद्रकांत पाटील; निवडणूकप्रमुखपदी राजेश पांडे

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

SCROLL FOR NEXT