पुणे

भोर-वेल्हा-मुळशी मतदारसंघ

CD

भोर-वेल्हा-मुळशी मतदारसंघ

अशी झाली लढत : २०१९
विजयी उमेदवार : पक्ष : मिळालेली मते (मताधिक्य)
संग्राम अनंतराव थोपटे : कॉंग्रेस : १ लाख ८ हजार ९२५ (९२०९)

कॉंग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला. कॉंग्रेस आणि संग्राम थोपटे यांचे प्रमुख राजकीय विरोधक म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मानला जातो. राष्ट्रवादीतील फुटीनंतर कट्टर विरोधक असूनही संग्राम थोपटे यांची लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना साथ. मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर गडकिल्ले, ऐतिहासिक वास्तू. पर्यटनवाढीसाठी मोठी संधी.

अशी आहे स्थिती
१. भोर विधानसभा मतदारसंघात १९७८ आणि १९९९ अपवाद वगळता कॉंग्रेसची एकहाती सत्ता
२. अनंतराव थोपटे यांच्यानंतर संग्राम थोपटे यांच्या हातात भोरची मदार कायम
३. शरद पवार आणि अनंतराव थोपटे राजकारणातील विरोधी होते. परंतु राष्ट्रवादीच्या फुटीनंतर संग्राम थोपटे यांची शरद पवार व सुप्रिया सुळे यांना साथ
४. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुळशीतील शंकर मांडेकर हे इच्छुक असून, त्यांनी गावभेट दौरा केलेला आहे
५. राष्ट्रवादीकडून माजी जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे आणि पुणे जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप इच्छुक
६. संग्राम थोपटे यांना प्रमुख विरोधक म्हणून शिवसेनेचे कुलदीप कोंडे कार्यरत. २०१९च्या निवडणुकीत संग्राम थोपटे यांच्यापेक्षा त्यांना केवळ ९ हजार २०९ कमी मते.
७. सद्य:स्थितीत शिवसेनेच्या वतीने भोरमधील कुलदीप कोंडे आणि मुळशीतील बाळासाहेब चांदेरे इच्छुक.
८. भाजपकडून मुळशीतील पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक किरण दगडे-पाटील हे एकमेव इच्छुक.


निवडणूक मुद्दे
भोर तालुक्यात एमआयडीसी झाली नसल्यामुळे बेरोजगारी वाढलेली आहे. तालुक्यात निसर्गसौंदर्य असूनही पर्यटनासाठी हव्या तेवढ्या प्रमाणात विकास झालेला नाही. धरणांच्या कालव्यांची कामे कित्येक वर्षांपासून अपूर्ण आहेत. गड-किल्ल्यांचे संवर्धन झालेले नाही. तालुक्यातील आणि भोर शहरातील लोक इतर ठिकाणी स्थायिक होत आहेत. राजकारणातील घराणेशाही थांबवण्याचे आव्हान. राजगड सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा? विश लिस्टवर म्हणाले...

IND vs NZ 2nd Test: विजयाचा 'घास' गेला, आता भारत-न्यूझीलंड दुसरा सामना केव्हा? करो वा मरो मॅच कुठे Live दिसणार?

परदेशात प्रिया बेर्डेंना चुकीची वागणूक, पाठीशी उभे राहिले जॉनी लिव्हर; अख्ख शूटिंग थांबवलं, शेवटी मॅनेजरने...

भाजप आमदाराच्या PAच्या पत्नीला पराभवाचा धक्का, निकालानंतर स्ट्रीट लाइट उतरवले; बिल भरायला दिला नकार

Latest Marathi News Live Update : मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडच्या राहुड घाटात दोन ट्रकचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT