पुणे

हवेली तालुक्यातच सर्वाधिक ‘लाडक्या बहिणी’

CD

पुणे/काटेवाडी, ता. १७ : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या सर्वाधिक लाभार्थी हवेली तालुक्यातील आहेत. सध्या चार लाख १३ हजार संख्या असून दुसऱ्या क्रमांकावर बारामती तालुका आहे. जिल्ह्यामध्ये २१ लाख ११ हजार ८८७ महिलांनी अर्ज दाखल केले असून, पडताळणीनंतर २० लाख ४८ हजार २९५ महिलांची योजनेसाठी निवड केली आहे. त्यामध्ये पुणे शहरातून ६ लाख ८२ हजार ४६ अर्ज महिलांनी केले होते. त्यापैकी सहा लाख ३८ हजार ६४१ महिलांचे अर्ज अंतिम केल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली.

राज्यशासनाची अतिशय महत्त्वाकांक्षी असलेल्या या योजनेसाठी मंगळवारी (ता.१५) अर्ज भरण्याची अंतिम दिवस होता. राज्यामध्ये सर्वाधिक अर्ज हे पुण्यातूनच आले आहेत. २१ लाख अर्जांपैकी ८ हजार ७६८ अर्ज हे कायमचे नाकारले असून ४ हजार २६८ अर्ज हे अंशतः नाकारले गेले आहेत. अद्याप ५० हजार ५५६ अर्जांची पडताळणी शिल्लक असून, शिल्लक अर्जांची पडताळणी आता आचारसंहिता संपल्यानंतरच होणार आहे. सोमवारी आणि मंगळवारी या अखेरच्या दिवशी महिलांनी दाखल केलेल्या अर्जांची पडताळणी शिल्लक राहिली आहे. मुदतवाढ दिल्यानंतर जवळपास अर्जांची वाढले असून, अखेरच्या पंधरा दिवसांत १ लाख ३१ हजार ८८७ महिलांनी अर्ज केले आहेत.

गाव पातळीवर समित्या स्थापन
जिल्ह्यातील ग्रामीण भागात बारामतीमध्ये १ लाख २२ हजार ८४८ लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला आहे. तर शहरालगत असलेल्या हवेली तालुक्यामध्ये ४ लाखाहून अधिक लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत लाभ मिळाला आहे. शासनाच्या निर्देशानुसार योजनेच्या अनुषंगाने गाव पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या असून शासकीय कार्यरत यंत्रणांची प्रत्येक गाव, वॉर्ड स्तरावर बैठका घेऊन नियोजन केले होते. सर्व अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांना प्रशिक्षण देण्यात आले होते.
प्रत्येक गावातील प्राप्त झालेले सर्व ऑफलाइन अर्जाचा डाटा संगणकीकृत करण्यासाठी ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सीआरपी बचत गट, सेतू सुविधा केंद्रातील डाटा ऑपरेटर यांच्यामध्ये वाटप करण्यात येऊन ऑनलाइन फॉर्म भरण्यात आले.

पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये अर्ज - २१ लाख ११ हजार ८८७
पुणे शहरासह जिल्ह्यामधील मंजूर अर्ज - २० लाख ४८ हजार २९५
पुणे शहरातील अर्ज - ६ लाख ८२ हजार ४६
पुणे शहरातील मंजूर अर्ज - ६ लाख ३८ हजार ४४१

- आचारसंहिता लागू झाल्याने लाडक्या बहिणींना सरकारकडून देण्यात येणार पत्राचे वाटप थांबले.
- अर्ज दाखल करण्यासाठी अंगणवाडी सेविकांसह इतरांना देण्यात येणारे मानधन अद्याप मिळाले नाही.
- एक लाख ५० हजार ३८४ पन्नास हजार महिलांचे आधार सीडिंग शिल्लक.
- आधार सीडिंग न केलेल्या बहिणींना आचारसंहितेनंतरच मिळणार लाभ.
- राज्यात २ कोटी ५२ लाख अर्ज दाखल

पुणे जिल्ह्यात योजनेसाठी अर्ज करण्यास महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्याने अर्जांची पडताळणी प्रक्रिया थांबविली आहे. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर म्हणजेच आचारसंहिता संपल्यानंतर योजनेच्या लाभार्थ्यांची पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
- जामसिंग गिरासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद.

जिल्ह्यातील तालुकानिहाय लाभार्थी :
तालुका : अर्जांची संख्या : मंजूर अर्जांची संख्या
आंबेगांव : ६४,९२५ : ६४,१४६
बारामती : १,२२,८४८ : १,२१,४६८
भोर : ५२,४५० : ५१,४४८
दौंड : १,०२,४०६ : १,०१,५३५
हवेली : ४,१९,८५९ : ४,१३,२१६
इंदापूर : १,१०,९६० : १,०९,३८५
जुन्नर : १,०५,३८४ : १,०४,४०२
खेड : १,१८,६९२ : १,१७,७०१
मावळ : ९६,९६८ : ९४,२१८
मुळशी : ४७,१९८ : ४६,११०
पुरंदर : ६७,८३९ : ६६,७९८
शिरूर : १,०५,६०८ : १,०४,८०९
वेल्हा : १४,७०४ : १४,४३८
पुणे शहर : ६,८२,०४६ : ६,३८,६४१

56232

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Survey : शक्तीपीठ महामार्गाच्या मॅपिंगसाठी पहाटे आलेल्या कर्मचाऱ्यांना भुदरगडच्या शेतकऱ्यांनी दिला चोप; सर्वे करणाऱ्यांना हाकलत साहित्य दिलं पेटवून

Gold Market: भावात घसरणीनंतर वाढ; प्रति दहा ग्रॅम २७०० रुपये महाग; चांदीही वधारली

Prithviraj Chavan: मुख्यमंत्री असताना साताऱ्याकडे मात्र दुर्लक्ष झाले; पृथ्वीराज चव्हाणांची कबुली; ज्यांना महत्त्वाची पदे दिली तेच भाजपमध्ये गेले

Latest Marathi News Update : जळगाव जामोद वनपरिक्षेत्रात वन्यजीव धोक्यात, २ बिबटे मृतावस्थेत

Pune Dengue Cases: पुण्यात डेंगीचा डंख वाढला! दहा महिन्यांत २ हजार ४०० रुग्ण; गेल्या वर्षीपेक्षा १०९ ने वाढ

SCROLL FOR NEXT