पुणे

कुल व थोरात गट पुन्हा एका व्यासपीठावर एकाच व्यासपीठावर

CD

खुटबाव, ता. ३ : दौंड तालुक्यात पारंपरिक विरोधक समजले जाणारे आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात यांचे कार्यकर्ते सुमारे दहा वर्षानंतर प्रचारानिमित्त एका व्यासपीठावर येत आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघात सन २०१४ च्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध महादेव जानकर यांच्यामध्ये लढत झाली होती. त्यावेळी तत्कालीन आमदार रमेश थोरात व विद्यमान आमदार राहुल कुल हे सुप्रिया सुळे यांचे काम करीत होते. त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकाच व्यासपीठावर होते. त्यानंतर राहुल कुल यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसशी फारकत घेतली. तेव्हापासून गेली १० वर्षे दोन्ही गट परस्पर विरोधात अनेक निवडणुका लढले.
राहुल कुल यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर सुरवातीला विधानसभेवेळी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करून विजयही मिळवला. मात्र, त्यानंतर मागील लोकसभा निवडणुकीवेळी त्यांच्या पत्नी कांचन कुल या बारामती लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवार झाल्या. त्यात त्यांना अपयश आले. मात्र, त्यानंतर राहुल कुल यांनी विधानसभा निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे महायुतीत सहभागी झाले. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आता बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी दहा वर्षानंतर प्रथमच कुल व थोरात या दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकाच व्यासपीठावर येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Ayurvedic Prasad: गणेशोत्सवातील प्रसादातून मज्जाधातूचे पोषण; आयुर्वेदानुसार मोदक, पंचामृत, लाडू व लाह्यांचे मेंदूवर्धक गुण

आजचे राशिभविष्य - 11 सप्टेंबर 2026

Haritalika Ritual: हरितालिका व्रताचा खरा अर्थ काय? पार्वतीच्या तपश्चर्येपासून विवाहातील प्रेम, निवड, संयम आणि नात्यांच्या संतुलनापर्यंत

Ayurvedic Treatment: ३५व्या वर्षी हाडे ठिसूळ होऊन वारंवार फ्रॅक्चर का? आयुर्वेदातून काय मदत मिळू शकते; आहार, अभ्यंग आणि उपचाराबाबत जाणून घ्या

Lucky Zodiac Signs : 10 वर्षांनंतर जुळून आला 'त्रिग्रही योग'! 11 सप्टेंबरला मिथुन, धनुसह 5 राशींना लॉटरी लागण्याची शक्यता; जुन्या गुंतवणुकीतूनही मिळणार बंपर परतावा

SCROLL FOR NEXT