पुणे

पिंपरी किस्से निवडणुकीचे

CD

किस्से निवडणुकीचे,
--
‘तो’ दबा धरून बसला अन्
पाया पडला, पण गैरसमज नसावा !

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कन्येचा गेल्या महिन्यात एचए कंपनीच्या मैदानावर थाटामाटात विवाह सोहळा झाला. राजकारणातील बडी नेते मंडळी हजर होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्याने अजित पवार यांच्यासोबत माजी महापौर तथा राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष व महायुतीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे हेही वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी आले होते. काही दिवसापूर्वीच त्यांची महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. व त्यांना पक्षाकडून मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाली होती. त्यामुळे त्यांनी प्रचारही सुरू केलेला होता. आमदार बनसोडे यांच्या कन्येच्या विवाह समारंभास उपमुख्यमंत्री अजित पवार आले त्यावेळी दोघेही समोरासमोर आले आणि वाघेरे हे पवार यांच्या पाया पडले. त्यावेळी पवार हे काही वेळ अवघडल्यासारखे दिसून आले. कारण, पवार हे महायुतीसोबत असून त्यांच्यातील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आहेत. मात्र, पवार यांच्या पाया पडतानाचे वाघेरे यांचे छायाचित्र व छायाचित्रण सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे पवार हे बारणे यांच्याऐवजी वाघेरे यांच्या पाठीशी असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली. तोच धागा पकडत पवार यांनी पिंपरी चौकातील महायुतीच्या बारणे यांच्या प्रचारसभेत स्पष्ट केले की, ‘मी आपल्या अण्णाच्या मुलीच्या विवाहाला आशीर्वाद देण्यासाठी गेलो होतो. मी येणार असल्याचे कळल्याने तो बाबा (वाघेरे) दबा धरून बसला होता. मी येताच, तो माझ्या पाया पडला आणि त्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे मतदार बांधवांनो आणि कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनो! काहीही गैरसमज करून घेऊ नका. आपले उमेदवार श्रीरंग बारणे असून, पंतप्रधान मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी धनुष्यबाणाचेच काम करायचे आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.’ पवार यांच्या या वक्तव्याचा व वाघेरे यांच्या पाया पडण्याचे ‘टायमिंग’ साधण्याचा किस्सा राजकीय वर्तुळात चांगलाच रंगला होता.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

SCROLL FOR NEXT