पुणे

‘समर युथ समिट’ची उत्सुकता शिगेला

CD

पुणे, ता. ३ : आर्थिक उन्नतीचे ज्ञान, सामाजिक जाण आणि देशभक्तीची भावना निर्माण होण्यासाठी तरुणाईच्या उत्सवाचे आयोजन ‘यिन’च्यावतीने ‘समर युथ समिट २०२४’ या निवासी शिबिरातून केले आहे. राज्यातील हजारोंच्या संख्येने तरुणाई या समिटसाठी येत्या ११ जून रोजी पुण्यात दाखल होणार आहे. हे विद्यार्थी एकत्र येऊन मान्यवरांच्या उपस्थितीत विचारमंथन करणार आहेत.
‘यिन’ने राज्यात लाखोंचे संघटन उभे केले आहे. यामध्ये काम करणारी तरुणाई दरवर्षी अनेक उपक्रमांत सहभागी होत असते. या उपक्रमांमध्ये ‘समर युथ समिट’ हा उपक्रम महत्त्वाचा आहे. आजपर्यंत विविध क्षेत्रांत अनेक मान्यवरांना यश मिळाले आहे. या यशाचे गमक ते सहभागी तरुणाईसमोर ठेवणार आहेत. स्वतःमधील कला ओळखून त्यात कसे काम करावे? आता मी कुठे आहे? मला काय करायला हवे? समोर आलेल्या समस्येला तोंड कसे द्यावे? सकारात्मकता कशी वाढवावी? सध्या आणि नंतर बाजारपेठेत कशाला मागणी असेल? संधीची वाट पाहण्यापेक्षा- संधी निर्माण कशी करावी? मुलाखतीला कसे सामोरे जावे? अशा मनातील अनेक प्रश्नांवर ज्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन मिळणार आहे.

ऑनलाइन नावनोंदणी
समर युथ समिट २०२४ पॉवर्ड बाय पिंपरी-चिंचवड विद्यापीठ आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, असोसिएट स्पॉन्सर ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल आणि महाएनजीओ फेडरेशन या कार्यक्रमाच्या काहीच जागा शिल्लक आहेत. त्यामुळे ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपला सहभाग नोंदवायचा आहे, त्यांना सोबत दिलेल्या क्यूआर कोडचा वापर करून ऑनलाइन अॅपवरून नावनोंदणी करीत येईल.

अधिक माहितीसाठी
यांच्याशी संपर्क साधा
- यिन राज्य समन्वय अधिकारी- अनिकेत मोरे (मो. नं. ७०५८१ ५११११).
- यिन प्रतिनिधी- सुजीत मासाळ- (मो. नं. ९१३०८ ३१२१२).

झपाट्याने बदलणाऱ्या आणि नव्या आव्हानांचा सामना करावा लागत असलेल्या आजच्या जगात समर्थपणे उभे राहता यावे, यासाठी या ‘समिट’मधून तरुणाईला योग्य दिशा मिळेल, याची मला खात्री वाटते.
- सुजल घाडगे, यिन जिल्हाध्यक्ष, पुणे ग्रामीण

संघटन उभे करणे सोपे असते, परंतु ते टिकवणे आणि वाढवणे खूप अवघड असते. पण हाच नेतृत्वविकास प्रत्येक विद्यार्थ्याला ‘यिन’कडून शिकायला मिळत आहे.
- निकिता खरात, यिन तालुकाध्यक्षा, बारामती

या ‘समिट’मध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, प्रभावी वक्ते, कलाकार, सेलिब्रेट, कवी यांच्यासोबत होणाऱ्या मुलाखती व भेटीसाठी आम्ही खूप उत्सुक आहोत.
- स्मृती लोंढे (नसरापूर), यिन विरोधी गटप्रमुख, पुणे जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT