पुणे

निवडणूक - खासदार कसा असावा

CD

निवडणूक - खासदार कसा असावा

खासदाराने आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी पाठपुरावा केला पाहिजे. मधू दंडवते व जॉर्ज फर्नांडिस ही नावे आदर्श होती. जॉर्ज फर्नांडिस हे तुरुंगात असतानाही विक्रमी मताने निवडून आले होते. तसेच मधू दंडवते हे मुंबई येथील कॉलेजमध्ये शिकवत असत. ते कोणत्या पक्षात नव्हते. मात्र, त्यांना त्यांच्या कर्तृत्वामुळे सर्वच पक्षांतील लोक मान देत असत. आपल्या मतदारसंघात विकास होऊन नागरिक सुखी कसे होतील, असा प्रयत्न करणारा खासदार असावा.
- रमेश डोंगरे, चिंचवड

खासदार हा प्रथम देशहित व जनहित जपणारा व जात धर्मपंथविरहित असावा. खासदार सुसंस्कृत व अभ्यासू असावा. भ्रष्टाचारी नसावा, निर्व्यसनी असावा. तळागाळातील सर्व थरातील दीनदुबळ्यांचे हित जपणारा असावा. शिक्षण, नोकऱ्या मिळाव्यात, शेतमालाला योग्य भाव व न्याय देणारा असावा. देशाची सर्वांगीण प्रगती विकास घडवणारा असावा. सर्व जगात भारताचे नाव उज्ज्वल करण्यासाठी अहोरात्र झटणारा एकनिष्ठ खासदार असावा.
- रमेश पाटील, थेरगाव


संसदेत पूर्णवेळ हजर असणे गरजेचे आहे. मतदारसंघातील अडीअडचणींवर चर्चा करणारा लोकाभिमुख, चारित्र्य संपन्न तसेच नम्र लोकप्रतिनिधी असावा, नागरिकांच्या प्रश्नांची जाण असावी, भ्रष्टाचारी नसावा, मिळणारा निधी पूर्ण क्षमतेने लोक कल्याणासाठी वापरणारा असावा, अधिवेशनात प्रत्येक चर्चेत सहभाग असावा. शासनाच्या सर्व योजना आपल्या मतदारांपर्यंत पोहोचवणारा असावा. दरमहा जनता दरबार भरवून नागरिकांच्या वैयक्तिक अडचणी, गाऱ्हाणी सोडविणारा व जनतेच्या सेवेसाठी सदा उपस्थित असावा, निवडणूक आल्यावर जातपात, पक्षविरहित काम करणारा असावा.
- रवींद्र कदम, विकासनगर किवळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT