पुणे

मद्यपींची पोलिसांनी उतरवली झिंग

CD

पिंपरी, ता. १८ : मद्यपान करून वाहन चालविल्याने रस्ते अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये वाहन चालकासह समोरच्या व्यक्तीच्या जिवालाही धोका निर्माण होतो. तरीही काही वाहनचालक मद्यपान करून वाहन चालवितात. अशा बेशिस्त वाहन चालकांची पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी चांगलीच झिंग उतरवली. मागील वर्षभरात जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत तब्बल चार हजार १५३ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली आहे.
दारूच्या नशेत वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होतात. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच अनेकजण गंभीर जखमीही झाले आहेत. रस्त्याने शिस्तीत जाणाऱ्या वाहन चालकांसह पादचारी व्यक्तीलाही एखादा मद्यपी येऊन धडकल्यास संबंधित व्यक्तीला काहीही कारण नसताना गंभीर परिणाम भोगावे लागतात. यामुळे अशा मद्यपींना वठणीवर आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मद्यपींवर कारवाईचा बडगा उगारला.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयांतर्गत असलेल्या भोसरी, दिघी-आळंदी, चाकण, देहूरोड, तळवडे, वाकड, सांगवी, बावधन, निगडी, पिंपरी, चिंचवड, हिंजवडी, तळेगाव, महाळुंगे या वाहतूक विभागांतर्गत वेळोवेळी ठिकठिकाणी नाकाबंदी लावून वाहन चालकांची ब्रेथ अॅनायलायझरद्वारे तपासणी करण्यात आली. यामध्ये मद्यपान केल्याचे आढळल्यास कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले.

एकाच दिवसात २७६ मद्यपींवर कारवाई
चालू वर्षातील जानेवारी महिन्यात विविध वाहतूक विभागांतर्गत ३४६ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. तर मागील आठवड्यात झालेल्या धुलिवंदनाच्या एकाच दिवसात तब्बल २७६ मद्यपींची झिंग पोलिसांनी उतरवली.

‘‘मद्यपी वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करून कशाही पद्धतीने वाहन चालवीत असतात. यामुळे इतर वाहन चालकांसह पादचाऱ्यांनाही धोका निर्माण होतो. अशाच पद्धतीने एका मद्यपी वाहनचालकाने त्याच्या भरधाव दुचाकीने माझ्या पादचारी मित्राला धडक दिली. त्यामध्ये मित्र गंभीर जखमी झाला.
- प्रताप दहितुले, नागरिक

‘‘मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी लावली जात असते. यामध्ये वाहन चालकांची तपासणी केली जात असते. वाहनचालक मद्यपान केल्याचे आढळल्यास रीतसर कारवाई करून गुन्हे दाखल केले जातात.
- सुनील पिंजण, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग

मद्यपी वाहन चालकांवर मागील वर्षात केलेली कारवाई
महिना कारवाई
जानेवारी २५३
फेब्रुवारी १०१
मार्च ५६०
एप्रिल ९५
मे ५३७
जून ८४५
जुलै २२८
ऑगस्ट २३९
सप्टेंबर १८१
ऑक्टोबर १८३
नोव्हेंबर १८४
डिसेंबर ७४७
एकूण ४१५३
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT