पुणे

कुपोषणमुक्तीसाठी सरसावले ‘झेडपी’चे अधिकारी

CD

पुणे, ता.१८ : जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने यावर्षी अधिकाऱ्यांनाच बालकांची जबाबदारी निश्चित करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. कुपोषित बालकांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत घटली आहे. असे असले तरीही कुपोषणमुक्त जिल्हा झालेला नाही. ३७५ कुपोषित बालकांसाठी पुढील नव्वद दिवस एका बालकाच्या पोषणाची जबाबदारी ही प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. परिणामी प्रत्येक बालकावर त्या अधिकाऱ्याचे विशेष लक्ष राहणार आहे.

जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी मागील दोन वर्ष ग्राम बालविकास केंद्रे सुरू करण्यात आले. जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आलेल्या या केंद्रांचा फायदा झाला. ही केंद्र यावर्षीही कार्यान्वित करण्यात आली होती.


३७५.....शून्य ते सहा वयोगटातील कुपोषित बालके
८२..... तीव्र कुपोषित
२९३..... मध्यम कुपोषित

बालकांच्या पोषणासाठी आणि पाहणीसाठी अधिकाऱ्यांना किमान दहा दिवसांतून एकदा बालक असलेल्या अंगणवाडीला भेट द्यावी लागणार आहे. कुपोषित बालकांचे आरोग्य व पोषण विषयक दर्जा सुधारण्यासाठी तीव्र कुपोषित आणि मध्यम कुपोषित बालकांना आवश्यक औषधोपचाराबरोबरच आहाराचीही आवश्यकता असते.

बालकाला नव्वद दिवसांसाठी दत्तक
कुपोषित बालकांसाठी स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होईल, अशा वेगवेगळ्या चवीचा सकस आहार उपलब्ध करून देण्याचे काम अधिकारी करणार आहेत. जिल्हा परिषदेने नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढील नव्वद दिवस त्यांना निश्चित केलेल्या बालकाला नव्वद दिवसांसाठी दत्तक म्हणून देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिले आहेत.

अधिकाऱ्यांचा यासाठी पुढाकार
- अंगणवाडी केंद्राला दहा दिवसांच्या अंतराने भेट, वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार.
- बालकांच्या वजन, उंचीबाबत स्वतः खात्री करून, बालकाची व कौटुंबिक परिस्थिती समजून घेणार.
- बालकाला कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी स्वतः नियोजन करावे लागणार.
- बालकांच्या गरजेप्रमाणे स्वतःहून त्यांना पौष्टिक आहार उपलब्ध करून दिला जाणार.
- बालकांच्या घरी भेट देऊन कुटुंबांतील सदस्यांना आहाराबाबत समुपदेशन केले जाणार.


जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या सूचनेनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांना कुपोषित बालकांची जबाबदारी देण्यात आली आहे. कुपोषणमुक्त पुणे जिल्हा अभियानांतर्गत पुढील नव्वद दिवस हा उपक्रम सुरू असणार आहे.
- जामसिंग गिरासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT