पुणे

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ‘स्किल ऑन व्हील्स’

CD

पुणे, ता. ३१ : ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना कौशल्याधारित आणि प्रायोगिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्किल ऑन व्हील्स हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील तीस शाळांमध्ये ही बस पोहोचणार आहे. उपक्रमाला विद्यार्थी व शिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची, माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.

लेंड अ हँड इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येण्यात येत आहे. स्किल ऑन व्हील्स ही प्रत्यक्षात एक मोबाईल लर्निंग बस आहे. या बसमध्ये विविध नावीन्यपूर्ण उपकरणे, विज्ञान प्रयोगांसाठी लागणारी मॉडेल्स आणि विद्यार्थ्यांना हाताळणीसाठी उपयुक्त कृती किट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थी या साधनांच्या माध्यमातून केवळ पुस्तकांमधील धडे वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष प्रयोग करून शिकत आहेत. त्यामुळे त्यांना व्यावसायिक व्यवहार, विज्ञानातील संकल्पना आणि जीवनकौशल्ये अधिक परिणामकारक रीतीने समजून घेता येत आहेत. या बसचा प्रवास ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार असून, त्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच प्रायोगिक शिक्षणाची समान संधी उपलब्ध होईल.

विद्यार्थ्यांचा सहभाग
उपक्रमाच्या शाळाभेटीला २५ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. मुळशी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कसारसाई येथे बस दाखल झाली. यावेळी सहावी आणि सातवीच्या ८९ विद्यार्थी आणि सहा शिक्षकांनी सहभाग घेतला. त्यानंतर बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिर्सुफळ येथे बस गेल्यानंतर ६० विद्यार्थी पाच शिक्षक उपस्थित होते. शिक्षक व विद्यार्थ्यांनी यावेळी प्रयोगशाळेतील उपकरणांचा अनुभव घेतला. विद्यार्थी उत्साहाने विविध विज्ञान प्रयोग, लघू प्रकल्प आणि कृती-केंद्रित उपक्रमात सहभागी झाले.

पुणे मॉडेल शाळा संकल्पनेचा भाग
या उपक्रमाला पुणे जिल्हा परिषदेच्या पुणे मॉडेल शाळेचा भाग बनविण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये केवळ मूलभूत साक्षरता किंवा गणिती कौशल्येच विकसित होणार नाहीत, तर त्यांच्यात सर्जनशीलता, चिकित्सक विचारसरणी आणि समस्या सोडवण्याची क्षमता देखील वाढीस लागणार आहे.

स्किल ऑन व्हील्समुळे ग्रामीण शाळांतील विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांबाहेरचे शिक्षण अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे त्यांची जिज्ञासा वाढते, सर्जनशीलतेला वाव मिळतो आणि भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठीही मदत होते. जिल्हा परिषदेची सर्व मुलांना दर्जेदार, समावेशक आणि कौशल्याधारित शिक्षण देण्याची संकल्पना यामुळे अधिक बळकट होत आहे.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी

45279

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिकमध्ये १० घरफोडीचे गुन्हे उघडकीस; सराईत गुन्हेगार जेरबंद

Kunbi Caste Certificate: नव्या जीआर नुसार कुणबी जात प्रमाणपत्र कसं मिळवाल? आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया जाणून घ्या, 'असे' तपासा पुरावे...

Latest Maharashtra News Updates : आम्हालाही हैदराबाद गॅझेटिअर लागू करावा; बंजारा ब्रिगेडचे रविकांत राठोड यांची मागणी

Cabinet Decision: पुणे मेट्रोच्या दोन मार्गिकांचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीतील सर्व निर्णय वाचा एका क्लिकवर

Stock Market Closing: शेवटच्या तासात जोरदार खरेदी; सेन्सेक्स 409 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स तेजीत?

SCROLL FOR NEXT