मंचर, ता. ४ : ‘‘प्रत्येकाने एखादी कला अवगत केली पाहिजे. त्याचा उपयोग व्यावहारिक जीवनात नक्कीच होतो, केवळ पाठ्यपुस्तकातील वाचन न करता अवांतर वाचन केले पाहिजे. गणित या विषयाची भीती न बाळगता त्याला छंद म्हणून जोपासल्यास गणित विषय अधिक गमतीशीर होईल,’’ असे मत गणित अभ्यासक लक्ष्मण गोगावले यांनी व्यक्त केले.
सकाळ माध्यम समूहाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सकाळ एनआयई (न्यूजपेपर इन एज्युकेशन) या उपक्रमांतर्गत मंचर (ता. आंबेगाव) येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय व नारायणगाव (ता. जुन्नर) येथील श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल येथे ‘गणिताशी गट्टी’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी गोगावले बोलत होते. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेत जन्मतारीख सांगताच क्षणार्धात वार सांगणे, चार अंकी संख्येचे गुणाकार तसेच गणितातील गमतीजमती, गणिती कोडे अनुभवताना विद्यार्थी आश्चर्यचकित झाले होते.
गोगावले म्हणाले, ‘‘गणित या विषयाबद्दल भीती न बाळगता तो छंद म्हणून जोपासल्यास तो अतिशय सुलभ होईल. गणितात निरनिराळ्या गमती तर आहेतच; त्याचबरोबर त्यात जादू सुद्धा आहे. गणित विषय अनेकांना अवघड वाटतो; परंतु तो सर्वांत सोपा विषय आहे.’’ यावेळी गोगावले यांनी विद्यार्थ्यांना गणितातील साध्या सोप्या भाषेतील सूत्रे सांगितली. त्यांनी विद्यार्थ्यांना गणितातील सोपी उदाहरणे देत स्पर्धा परिक्षा, शिष्यवृत्ती परिक्षा यांना कसा उपयोग होतो, हे उदाहरणासह सांगितले. याप्रसंगी प्राचार्य नितीन बाणखेले, पर्यवेक्षक डि.आर. बच्चे, डि. के. काळे, गुरुकुल विभागप्रमुख कल्याणी बांगर, सीमा बाणखेले, मनीषा थोरवे, विजय कोल्हे, कोमल कोल्हे, तृप्ती कराळे, प्रज्ञा खोडदे, श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका अनघा जोशी, स्मिता कुलकर्णी, पर्यवेक्षिका वैशाली पुंडे आदी उपस्थित होते. सकाळ एनआयईचे वरिष्ठ व्यवस्थापक विशाल सराफ यांनी संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.