पुणे

जिल्ह्यात वाढणार शेतमालाचे उत्पादन

CD

पुणे, ता. १० : नवीन पिकांचे वाण शेतकऱ्यांपर्यंत पोचावे, शेतमालाचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागाकडून २०२५-२६ रब्बी हंगामासाठी विविध पिकांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन केले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जवळपास पाच हजार हेक्टर क्षेत्राची निवड केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्वारी, हरभरा आणि करडई पिकांचा समावेश असणार आहे.

प्रात्यक्षिकांतून केवळ बियाणे वाटपच नाही, तर आधुनिक लागवड पद्धती, पाणी बचतीच्या तंत्रज्ञानाचा वापर, संतुलित खत व्यवस्थापन आणि कीडनियंत्रणाचे वैज्ञानिक उपाय शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दाखवून दिले जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी अनुभव घेऊन नव्या पद्धती आत्मसात करू शकतील, अशी कृषी विभागाला अपेक्षा आहे. खतांचा अधिक वापर करण्याची गरज पडू नये म्हणून विज्ञान केंद्रांच्या तंत्रज्ञानानुसार बीजप्रक्रिया करण्यावर अधिक भर दिला जाईल, याचा प्रात्यक्षिकांमध्ये समावेश असेल. विशेष म्हणजे, हरभरा, ज्वारी आणि करडई या पिकांच्या नवीन वाणांच्या प्रचार-प्रसाराला अधिक चालना देण्यात येणार आहे. बियाण्यांची निवड, बीज प्रक्रिया, पेरणी या संपूर्ण प्रक्रियेत कृषी तज्ज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मागील पाच वर्षांमधील बियाणांच्या वाणांचा या प्रात्यक्षिकामध्ये समावेश असणार आहे. त्याचबरोबर कृषी विद्यापीठांमार्फत विकसित केलेल्या नवीन वाणांची पेरणी शेतकऱ्यांच्या शेतात केली जाणार आहे, त्यांचे गुणधर्म आणि फायदे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहेत.

शेतकऱ्यांना सहभाग कसा घेता येणार?
३१ मार्च २०२४ पूर्वी नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या व कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांना या उपक्रमामध्ये लाभ घेता येणार आहे. सहभागी होण्यासाठी गटाने सदस्यामार्फत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. गटांची निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर करण्यात येणार आहे.

फार्मर आयडी बंधनकारक
अर्जासाठी महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या संकेतस्थळावर बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, औषधे आणि खते या अंतर्गत शेतकरी गटांना अर्ज करता येतील. अर्ज करणाऱ्या आणि लाभ घेणाऱ्या गट सदस्यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.

विविध पिकांच्या प्रात्यक्षिकांचा हा उपक्रम शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या आधारे उत्पादन वाढविण्याची, खर्च कमी करण्याची आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याची संधी यामुळे शेतकऱ्यांना मिळेल. याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे बियाण्यांचे नवीन वाण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, त्यांना संबंधित पिकांमधील विविध वाणांची माहिती होण्यासाठी हे प्रात्यक्षिके महत्त्वाची ठरतात.
- संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

GT vs PBKS: ४७ वर ५ विकेट्स, मग सुर्यांश शेडगे ठरला पंजाबसाठी संकटमोचक; गुजरातच्या वेगवान माऱ्यासमोर श्रेयस अय्यरचे शिलेदार ढेपाळले

खोटं बोलून नदी किनारी नेलं; नंतर जावयानं सासूला क्रूरपणे संपवलं, संतापजनक कारण समोर

Velhe Nasrapur Protest: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा राजगड तालुक्यात तीव्र पडसाद; वेल्हे-पानशेतसह परिसर कडकडीत बंद

SCROLL FOR NEXT