पुणे

तीन आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय मानांकन

CD

जिल्ह्यातील तीन आरोग्य मंदिरांना मानांकन

पुणे, ता. ३१ : जिल्ह्यातील आयुष आरोग्य सेवेसाठी तीन आयुष्मान आरोग्य मंदिरांना (आयुष) नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अॅण्ड हेल्थकेअर प्रोव्हायडर्सचे (एनएबीएच) राष्ट्रीय मानांकन मिळाले आहे. जिल्ह्यात तेरा आयुष्मान आरोग्य मंदिर आहेत. तिथे आयुर्वेदिक उपचार केले जातात.
जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या जुन्नर तालुक्यातील राजूर, शिरूरमधील धामारी आणि बारामतीमधील जळगाव कडे पठार येथील आयुष्मान आरोग्य मंदिरांचा यामध्ये समावेश आहे. एनएबीएच हे गुणवत्ता परिषदेअंतर्गत कार्यरत मंडळ असून, रुग्णालये व आरोग्य संस्थांना रुग्ण सुरक्षितता व सेवेच्या गुणवत्तेच्या मानदंडांनुसार मान्यता देते. एनएबीएच समितीच्या तज्ज्ञांमार्फत आयुष्मान आरोग्य मंदिरांची सखोल तपासणी करण्यात आली होती. मानांकनासाठी आवश्यक सर्व निकष पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतींच्या सहकार्याने विविध आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली. आरोग्य केंद्रांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एनएबीएच मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व नोंदी अद्ययावत ठेवल्या. स्वच्छता व साफसफाईवर विशेष भर देण्यात आला असून, हर्बल गार्डन तयार करून परिसराचे सुशोभीकरणही करण्यात आले. यासोबतच ग्रामस्थांकडून अभिप्राय घेण्यात आला. सर्व पात्रता निकषांची पूर्तता झाल्यानंतर या संस्थांना मिळालेले एनएबीएच मानांकन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांच्या हस्ते डॉ. बालाजी लकडे जिल्हा आयुष अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित प्रदान करण्यात आले.

माहिती पुस्तकांचे वाटप
आयुष्मान आरोग्य मंदिरांमार्फत आयुष अभियानांतर्गत विविध आजारांवर आयुर्वेद उपचार, आरोग्यदायी जीवनशैलीसाठी योग व प्राणायाम सत्रे, आयुर्वेदोक्त दिनचर्या व ऋतुचर्येबाबत मार्गदर्शन तसेच सामान्य आजारांवर उपयोगी आयुर्वेदिक वनस्पतींच्या वापराबाबत माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यात येते.

Gold Rate: २०२६ मध्ये सोन्याचा दर २ लाखांपर्यंत पोहोचणार? ज्योतिषांचं भविष्याबद्दल भाकित, दर वाढीचे स्पष्ट संकेत

Savalyachi Janu Savali मध्ये मोठा ट्विस्ट; असं समोर येणार सावलीच्या आवाजाचं सत्य; नेटकरी खुश, म्हणतात-

Elon Musk’s big hint for Content Creators : इलॉन मस्क करणार ‘कंटेट क्रिएटर्स’ना मालामाल!, ‘Youtube’ पेक्षा जास्त पैसा 'X' देणार

Dombivli Politics: ज्यांच्याशी वाद, त्यांच्याच सोबत रणनीती! डोंबिवलीत पॅनल २२ मधील ‘राजकीय गणित’ उघड

Vijay Hazare Trophy मध्येही दिसली 'पांड्या पॉवर'; चौकार - षटकारांची बरसात करत झळकावली शतकं, संघाचाही मोठा विजय

SCROLL FOR NEXT