पुणे

‘वॉलनट’, ‘दिल्ली पब्लिक’कडून गोलांची आतषबाजी

CD

पुणे, ता.१९ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्सच्या फुटबॉल स्पर्धेत १४ वर्षांखालील सामन्यांमध्ये बुधवारी (ता.१९) शिवणेच्या वॉलनट स्कूलचे दमदार पाच; तर महंमदवाडीतील दिल्ली पब्लिक स्कूलच्या खेळाडूंचे चार असा मैदानावर गोलांचा पाऊस पाडला. त्यामध्ये वॉलनटच्या साहिल हिवाळे, सक्षम धावडे; तर दिल्ली पब्लिकमधील खेळाडू विहान चव्हाण, ओंकार जाधव यांनी प्रत्येकी दोन गोल केले. दुसऱ्या सामन्यात खराडीच्या व्हिक्टोरिआ किड्स, कर्वेनगरमधील मिलेनियम नॅशनल स्कूल (अ) आणि हडपसरच्या बिल्लाबोंग हाय इंटरनॅशनल स्कूलने विजय मिळवत आगेकूच केली.
भारती विद्यापीठाच्या फुटबॉल मैदानावर स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पाच सामने खेळविण्यात आले. त्यात पहिला सामना बालेवाडी डेफोडील इंटरनॅशनल स्कूल आणि खराडीच्या व्हिक्टोरिआ किड्स स्कूल (अ) मध्ये झाला. त्यामध्ये पहिल्या सत्राच्या पाचव्या मिनिटांत व्हिक्टोरिआ किड्सच्या प्रथमेश वन्नम याने एक गोल करत संघाला आघाडी दिली. परंतु काही मिनिटांतच डेफोडील इंटरनॅशनल स्कूलच्या कौशल पटणे याने एक गोल करून सामना बरोबरीवर आणला. यात दोन्ही संघांतील खेळाडूंकडून आक्रमक खेळ बघायला मिळाला. शेवटच्या क्षणाला व्हिक्टोरिआ किड्सचा शौर्य खोत याने निर्णायक गोल मारून संघाला विजय मिळून दिला. व्हिक्टोरिआ किड्स स्कूल (अ) संघाने २-१ असा विजय मिळविला. दुसरा सामना कर्वेनगरच्या मिलेनियम नॅशनल स्कूल आणि रहाटणी येथील एस.एन.बी पी. इंटरनॅशनल स्कूलच्या संघात सामना रंगला. यात मिलेनियम नॅशनल स्कूलच्या खेळाडूंनी सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला. पहिल्या सत्रात समरवीर नागवेकर याने एक गोल केला हाच गोल विजयासाठी निर्णायक ठरला. सामन्यात विजयी मिलेनियम संघातील समरवीर नागवेकर याला शिवराज कामठे, आदित्य येळने यांची उत्तम साथ मिळाली.

शिस्तबद्ध खेळाचे प्रदर्शन
या स्पर्धेत १४ वर्षांखालील सामन्यांमध्ये खेळाडूंकडून शिस्तबद्ध खेळ, रणनीतीचा अचूक वापर आणि संघभावना यांचा सुंदर मेळ दिसला. दुपारी खराडीच्या व्हिक्टोरियास किड्स (ब) आणि शिवणेच्या वॉलनट स्कूलमध्ये झालेल्या सामन्यात वॉलनट स्कूलने ५-० असा व्हिक्टोरियास किड्स (ब) संघाचा धुवा उडविला. वॉलनटच्या साहिल हिवाळे याने सहाव्या मिनिटाला एक आणि आठव्या मिनिटाला दुसरा गोल करत संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. दुसऱ्या सत्रात सक्षम धावडे याने दोन व विहान पटेल याने एक गोल केला. या खेळाडूंच्या जोरावर वॉलनट स्कूलने व्हिक्टोरियास किड्स स्कूलवर ५ -० असा विजय मिळविला. तर महंमदवाडीचे दिल्ली पब्लिक स्कूल आणि आंबेगाव बुद्रूक पोदार इंटरनॅशनल स्कूल यांच्यातील सामन्यात दिल्ली पब्लिक स्कूलने ४ - ० असा पोदार इंटरनॅशनल स्कूलचा पराभव केला. दिल्ली पब्लिक स्कूलचा विहान चव्हाण, ओंकार जाधव याने प्रत्येकी दोन केले.

सतेजचे उत्तम गोलरक्षण
खराडीच्या कोठारी इंटरनॅशनल स्कूल आणि हडपसर येथील बिल्लाबोंग हाय इंटरनॅशनल स्कूल संघात शेवटचा सामना रंगला. त्यात कोठारी स्कूलच्या ऋत्विक झांजी याने पहिल्या सत्रात एक गोल केला. तर बिलाबोंग स्कूलच्या रियाश गुप्ता याने सामना संपण्याचा शेवटच्या मिनिटाला एक गोल करत संघाला बरोबरीवर आणले. त्यामुळे सामना ट्रायबेकरवर गेला. यात बिल्लाबोंग स्कूलच्या सतेज डुंगवल याने उत्तम गोलरक्षण करत महत्त्वपूर्ण दोन गोलचा बचाव केला. यात बिल्लाबोंग स्कूलने ३-२ असा विजय मिळविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT