पुणे

आर्येश राऊत, मनन जैनचा आक्रमक खेळ

CD

पुणे, ता. २० ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स फुटबॉल स्पर्धेत १४ वर्षांखालील सामन्यांमध्ये कर्वेनगरच्या मिलेनियम नॅशनल, कोंढवा येथील पी.जी.के.एम स्कूल व चिंचवडमधील एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलने प्रतिस्पर्धी संघांना गुरुवारी (ता.२०) पराभूत केले. यावेळी एल्प्रो इंटरनॅशनलच्या आर्येश राऊत व पी.जी.के.एम स्कूलच्या मनन जैन यांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत प्रत्येकी दोन गोल केले.
भारती विद्यापीठाच्या फुटबॉल मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. कर्वेनगरच्या मिलेनियम नॅशनल स्कूलने कोथरूडच्या माईर्स एम.आय.टी स्कूलवर २-० असा विजय मिळविला. नील जोशी याने सुरुवातीच्या तीन मिनिटांतच एक गोल करत संघाचे खाते उघडले. शेवटच्या मिनिटाला वेदांत सप्ते याने एक गोल केला. दुसरा सामना चिंचवड येथील एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल आणि खराडीच्या व्हिक्टोरिअस किड्स स्कूलमध्ये रंगला. त्यात एल्प्रो इंटरनॅशनलने व्हिक्टोरिअस किड्सवर ३-० असा विजय मिळविला. एल्प्रो इंटरनॅशनलच्या क्रिशव सिंग याने सामना सुरू होताच उत्कृष्ट गोल केला. तर अचूक पासिंगच्या जोरावर आर्येश राऊत याने सातव्या आणि सोळाव्या मिनिटांत दोन गोल केले.

दिल्ली पब्लिकचा पराभव
शेवटच्या सत्रात कोंढवा पी.जी.के.एम स्कूलने हिंजवडीच्या दिल्ली पब्लिक स्कूलवर ३-० असा एकतर्फी विजय मिळविला. त्यात पहिल्या सत्रामध्ये सहाव्या व सोळाव्या मिनिटाला पी.जी.के.एमच्या मनन जैन याने सलग दोन गोल करत संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. यासोबतच पी.जी.के.एम संघाच्या खेळाडूंनी अचूक पासिंग, चपळ हालचालींच्या जोरावर दिल्ली पब्लिक स्कूलवर दबाव कायम ठेवला. पी.जी.के.एम. संघाचा क्रिशव सिंग याने शेवटच्या सत्रात एक गोल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

Female Foeticide Law : 7 ते 10 वर्षांची जेल आणि थेट कारवाई! स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसण्यासाठी सरकारने आखला 'हा' प्लॅन; आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

ठरलं! या दिवशी भेटीला येतेय 'मोहिनी'; कलर्स मराठीवर 'ही' गाजलेली मालिका होणार बंद? प्रेक्षक नाराज

Latest Marathi News Live Update : नागपूर–मुंबई महामार्गावर भीषण अपघात; राँग साइडने आलेल्या कारने चौघांना उडवलं

SCROLL FOR NEXT