नारायणगाव, ता. १८ : पुणे- नाशिक महामार्गावर नारायणगाव (ता. जुन्नर) येथे शुक्रवारी (ता. १७) सकाळी झालेल्या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी आयशर मालट्रक चालक रोहित कुमार जगमालसिंग चौधरी (वय ३०, रा. मोहमदपूर जाट, ता. बावल, जि. रेवाडी, हरियाना) व नाशिक- महाबळेश्वर या एसटी बसचे चालक भाऊसाहेब भास्कर जयभाई (वय ४०, सध्या रा. महाबळेश्वर, जि. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक केली आहे, अशी माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
अटक आरोपींना शनिवारी जुन्नर न्यायालयात हजर केले असता आयशर मालट्रक चालक जगमालसिंग याला तीन दिवसांची पोलिस कोठडी; तर एसटी बस चालक जयभाई याला न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे.
महामार्गावरील अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी स्थानिक पोलिस, महामार्ग सुरक्षा गस्त पथक व आरटीओ एकत्रितपणे उपाययोजना करतील. अपघातग्रस्त प्रवासी वाहनाला ७+१चे परमीट असताना जास्त प्रवाशांची वाहतूक कशी केली. याप्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.
- डॉ. पंकज देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण
अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी वेळोवेळी कारवाई केली जाते. नागरिकांनी जीव धोक्यात घालून प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनातून प्रवास करू नये. एसटी बसमधून सुरक्षित प्रवास करावा.
- राहुल जाधव, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.