पुणे

उजाड माळरानावर फुलविले ‘रेशीम’चे नंदनवन

CD

ऋषिकेश वाघ : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ९ : बारामती तालुक्यातील जिरायती पट्टा म्हणून ओळख असलेल्या भागातील देऊळगाव रसाळ (ता. बारामती) येथील प्रगतशील शेतकरी तानाजी रसाळ यांनी उजाड माळरानावर पारंपरिक शेतीला फाटा देत नंदनवन फुलविले आहे. रेशीम शेतीमधून त्यांनी आर्थिक उन्नती साधली आहे.
बारामतीच्या जिरायती भागात पावसावर अवलंबून शेती केली जाते. मात्र, काही शेतकऱ्यांनी बारमाही शेती करण्यासाठी शेततळी केली आहेत. त्यात शेतकरी तानाजी रसाळ यांनीदेखील उजाड माळरानावर हरित क्रांती घडविण्यासाठी आपल्या एक एकर शेतीमध्ये तीन कोटी लिटर पाणी साठवण क्षमता असलेले शेततळे तयार केले आहे. त्यामुळे त्यांना बारमाही शेती करण्यासाठी पाण्याचा हक्काचा स्रोत उपलब्ध झाला आहे.
ते शेतीमध्ये सतत वेगवेगळे प्रयोग करीत असतात. त्यांनी वर्ष २०१९मध्ये एक एकर शेतीमध्ये व्ही-१ (V१) या वाणाच्या सहा हजार तुती रोपांची लागवड केली. तसेच, दीड ते दोन लाख रुपये खर्चातून २२ बाय ५० फूट आकाराचे शेड उभारले. तो प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी आणखी एक एकर क्षेत्रामध्ये तुतीची लागवड केली आहे. त्यासाठी त्यांनी पहिल्याच शेडच्या आकाराएवढे दुसरे शेडही उभारले. एका बॅचला एका शेडसाठी दोनशे अंडीपुंज घेतली जातात. एका वर्षात एका शेडच्या पाच ते सहा बॅच निघतात. एका बॅचला १० हजार रुपये खर्च येतो. प्रतिकिलो कोषासाठी सरासरी ४५० ते ७५० रुपये भाव मिळतो. एका बॅचमधून ५० ते ६० हजार रुपये नफा मिळतो. वर्षाला सरासरी ६ ते ७ लाख रुपये नफा मिळतो. तसेच, तीन वर्षांसाठी पावणेतीन लाख रुपये अनुदान मिळाले आहे. बारामतीसारख्या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध झाल्याने रेशीम कोष विक्री देखील सोईस्कर झाली आहे. त्यांना वर्ष २०२४मध्ये एक किलो कोषासाठी ७०५ रुपये सर्वाधिक दर मिळाला होता.

कुटुंबांची साथ मोलाची
शेतीमध्ये विविध प्रयोग करीत असताना रसाळ यांना त्यांची पत्नी राणी, मुले ओंकार, जय, पुतणे जगदीश, हरी आणि भावजय सोनाली यांची मदत मिळाली. रसाळ यांनी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करीत आर्थिक उन्नती साधली असून, मुलांना आणि पुतण्यांना उच्चशिक्षित केले आहे.

आमच्या भागात शाश्वत पाणी योजना नाही. त्यामुळे आमच्या भागात पावसावर आधारित आठमाही शेती केली जाते. मी एक एकर शेतीमध्ये तीन कोटी लिटर पाण्याची क्षमता असलेले शेततळे केले आहे. त्यामुळे बारमाही शेती करणे शक्य झाले आहे. आता पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेती करण्याकडे माझा कल असतो. त्यामुळे मी रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला आणि पूर्ण कुटुंबांचीही मला साथ मिळाली.
- तानाजी रसाळ, प्रगतशील शेतकरी, देऊळगाव रसाळ (ता. बारामती)

रेशीम कोषाला प्रतिकिलोला मिळालेला भाव (रुपयांत)
सन २०१९ - ५५० ते ६००
सन २०२०- ५८० ते ६५०
सन २०२१ - ६५० ते ७००
सन २०२२- ६७० ते ७०५
सन २०२३ - ६०० ते ७००
सन २०२४ - ५३० ते ६००
सन २०२५ - ६०० ते ७००

66732, 66736, 66739

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Alert Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात जोरदार हालचाली, पुण्यात अलर्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘वर्षा’वर पोलिसांची घेतली बैठक

Delhi Blast: खोली भाड्याने घेऊन साठवलं होतं बॉम्ब बनवण्याचं साहित्य; काही तासांपूर्वीच ३०० किलो आरडीएक्स जप्त, दिल्ली स्फोटाशी काय कनेक्शन?

Delhi Red Fort blast Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घटनास्थळी पोहचले ; जखमींचीही भेट घेणार

Delhi Bomb Blast Fire Officer Video : दिल्ली स्फोटाच्या घटनास्थळी सर्वात पहिल्यांदा पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं नेमकं काय घडलं

Delhi Blast Update : तीन वेळा जमिनीवर आपटलो, दूरपर्यंत आगीच्या ज्वाळा... दिल्ली स्पोटातील प्रत्यक्षदर्शींने सांगितला हादरवणारा प्रसंग

SCROLL FOR NEXT