पुणे

दीर्घआयु दायिनी निसर्गस्नेही जीवनशैली

CD

मोठ्या प्रमाणात शहरी जीवन शैलीचे आकर्षण आणि अनुकरणामुळे मावळाच्या ग्रामीण भागातील लोकांच्या स्थलांतर आणि खर्चात वाढ झाली आहे. रस्त्याचा अभाव, नैसर्गिक स्रोतांचा वापर करून त्याचे व्यवसायात रूपांतरित करण्याऱ्या ज्ञानाचा आणि प्रशिक्षणाचा अभाव यामुळे पारंपरिक ज्ञान नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. वास्तविक, मावळातील ग्रामीण भाग हा निर्मितीची केंद्रे आहे. उत्तम आरोग्य, चांगल्या सवयी लागल्याने मानवी जीवनाला दीर्घायु प्राप्त होते. प्रक्रियात्मक ज्ञान या भागांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. योग्य ज्ञान आणि त्या योगे दाम मिळाल्यास अनेक प्रश्न सुटतील.
- नामदेव आखाडे, पाले पठार
------------------------
पु ण्याच्या दिशेने आल्यावर कामशेत बाजारपेठेतून उजवीकडे इंद्रायणी नदी ओलांडली की नाणे गावची हद्द चालू होते. याच नाणे गावातून उत्तरेकडे दोन किलोमीटर पुढे गेले की खंडोबा मंदिराजवळून डाव्या बाजूने एक रस्ता डोंगराची चढण मागे टाकत वळणावळणाने पुढे पुढे जातो आणि मावळच्या नयनरम्य स्वर्गाच्या दारात नेऊन ठेवतो. मावळ तालुक्यातील आंदर मावळ आणि नाणे मावळला विलग करणारी ही डोंगररांग. नाणेपासून ढाकभैरी गड ते थेट कुसुर गावच्या माथ्यावरील रायगड जिल्ह्याच्या सीमेपर्यंत विस्तीर्ण पसरलेले सुमारे २५ ते ३० किमी अंतराचा निसर्गसंपन्न पठारचा परिसरात माणसाची नैसर्गिक जीवनपद्धती आजही टिकून आहे.
जुन्या पिढीने पारंपरिक पद्धतीने केलेली शेती, पशुपालन, खानपान, राहणीमान, वनौषधी, आहारातील पारंपरिक पदार्थ, जगण्यातला साधेपणा, अशा पद्धतीने हे आजही टिकवून ठेवले आहे. पशुपालन हे पिढ्यान पिढ्यापासून चालत आले असल्याने इथली सकाळ भल्या पहाटे होते. दूध काढणे, गुरं बाहेर बांधणे, शेण काढणे, दूध घेऊन जाणे व इतर सकाळची कामे ही रोजची नियमावली. धो-धो कोसळणारा मॉन्सून, त्यामुळे निर्माण झालेली विपुल वनसंपदा आणि नैसर्गिक भौगोलिक रचना यामुळे हा भाग अधिक सुंदर दिसतो. अगदी अलीकडच्या काळात या भागात माऊ ते सटवाई वाडी- उकसान पठार असा रस्ता मंजूर झाला असून त्याचे काम सुरू आहे. अलीकडील १० ते १२ वर्षांपूर्वीपर्यंत या भागांतील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी पायी चालण्याव्यतिरिक्त दळणवळणाचे साधन नव्हते. फार तर शेतमार्गातून बैलगाडीचा वापर होत असे. २०१० च्या सुमारास पवनचक्कीसाठी तयार करण्यात आलेल्या रस्त्यामुळे येथील तरुणांना दुचाकी वापरणे सोयीस्कर झाले.

सेंद्रिय शेती, पशुपालन
निसर्गस्नेही जीवन जगताना पारंपरिक सेंद्रिय शेती, रानभाज्या आणि गावरान पशुपालनातून दूध विक्री हेच येथील लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन. मुलांना पारंपरिक शेती करणे, दूध काढणे याचे बाळकडू घरातून दिले जाते. साधारण आजारासाठी आजही घरगुती उपचार केले जातात. त्यामध्ये थंडी, ताप, सर्दी, खोकला यांचा समावेश आहे. प्रामुख्याने स्थानिक मुलांच्या शिक्षणासाठी माऊवाडी, सटवाईवाडी येथे प्राथमिक शाळा आहे. माध्यमिक, उच्च शिक्षणासाठी शहरातील वसतिगृह किंवा कमवा आणि शिका या धोरणाने शिक्षण पूर्ण केले जात आहे. वडगाव, तळेगावातील वसतीगृहांच्या सोयीमुळे येथील मुला-मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे.

सेंद्रिय पद्धतीने शेती
पारंपरिक सेंद्रिय शेतीमध्ये भात, नाचणी, वरई, सावा, तीळ, अशी पिके घेतली जातात. यामध्ये, शेण, राबपिक, पालापाचोळा यांचा उपयोग केला जातो. या भागात शेतीत अजूनही किटकनाशके, रासायनिक खते यांचा वापर केला जात नाही. येथील शेती प्रामुख्याने वर्षभराचे धान्य व उन्हाळ्यासाठी पशुंच्या चाऱ्यासाठी केली जाते. शेतीबरोबरच पशुपालन हा प्रमुख व्यवसाय केला जातो. यामध्ये म्हैस, देशी गोवंश यांचा सांभाळ केला जातो. गोवंश शेतीसाठी उपयोगात आणला जातो. अजूनही या भागात संकरित जनावरे आढळून येत नाहीत.

निसर्ग उपासक समाज
या भागातील सण-उत्सवात येथील समाज निसर्ग उपासक असल्याचा प्रत्यय येतो. पशुधनाला प्रामुख्याने भीत हिस्त्र श्वापदांची असे. येथील धनगर समाजाकडे परंपरेने मोठ्या प्रमाणात पशुधन होते. त्यामुळे जंगलात देवालये स्थापन करून त्याला साकडे घातले जाते. त्यामध्ये ढाक गडावरील भैरवनाथ मंदिर, कांब्रे पठार येथील वाघोबा मंदिर, उकसान पठार येथील वाघजाई माता मंदिर, वनराईतील सटवाई माता मंदिर, पूर्वेकडील मोरमारेवाडी पठारावरील शिवेश्वराचे मंदिर, कलमजाई मातेचे मंदिर यांची नावे प्रामुख्याने घेता येतील. धार्मिक कार्यात त्यांचा प्रभाव जाणवतो. गजनृत्य, कोळी नृत्य केली जातात. वाघबारस, बोंबील बारस, बैलपोळा हे सण पशुपालक समाजामध्ये परंपरेने आलेले आहेत.

शेतीवर परिणाम
अनेक औषधी वनस्पती या निसर्गात आढळतात. पिढ्या न पिढ्या याद्वारे उपचार करून येथील समाजाच्या पूर्वजांनी आपले आरोग्य जपले. शेतीला लागणारी सर्व अवजार निर्मितीचे ज्ञान असल्याने घर, कृषी अवजारांची लाकडापासून निर्मिती झाल्याचे दिसून येते. कायम श्रमनिष्ठा असल्याने त्यांचे आरोग्य उत्तम राहिले. शेतीची कामे अंगमेहनतीची असल्याने पूर्ण परिवारासह शेती केली जाते. परंतु रोजगाराचे माध्यम बदलल्याने पारंपरिक ज्ञान कमी होऊ लागले आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेती करणे कठीण झाले आहे. आता मात्र लहान कुटुंब- सुखी कुटुंब यामुळे परिवारिक फरपट होत असून शेती ओस पडत आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाच्या गैरसोयी असल्याने तसेच अद्ययावत उच्च गुणवत्तेचे शिक्षण शहरात मिळते, यासाठी मिळेल त्या रोजगारावर शहरी जीवन स्वीकारले जाते. त्यातून खर्चाची वाढ होत आहे. परिपूर्ण शारीरिक क्षमता आणि पारंपरिक ज्ञान असताना केवळ आकर्षणापोटी शहरी जीवनाची ओढ निर्माण होत आहे. आजही ग्रामीण भागाकडे असुविधा, मागास या नजरेने पाहिले जाते. पण, शहर आणि गाव यातील फरक कायम राहिला पाहिजे.

पर्यटन व्यवसायास चालना
पठारावरील पांडवकालीन टाके, पायऱ्या, लेणी, गुहा (गडद) या मोरमारेवाडी, पाले व उकसानच्या पठारी भागात आढळून येतात. ब्रिटिशकालीन काब्रे पठारची विहीर, सूर्वान तळे, वनातील श्रद्धास्थान वाघोबा, वाघजाई माता, कळमजाई माता मंदिर, शिवेश्वर मंदिर, सट्टवाई मंदिर, ढाक भैरी या भागातून एका दिवसात डोंगररांगेने भीमाशंकर पायी जाता येते. ही नंदीची उपासक मंडळी महाशिवरात्रीच्यादिवशी भीमाशंकरला पायी जात असत. पठारावरील निसर्गाचे जतन, संवर्धन केल्यास येथील वनराई, कायम राहील. थंड हवा, कास पठारावरील बहुतांश फुले येथेही आढळतात. येथे अंदर आणि नाणे मावळातील अनेक धबधबे येथून निर्माण होत असून हा भाग अद्याप पर्यटकांपासून दुर्लक्षित आहे. या भागाचे शहरीकरण करण्याऐवजी जतन, संवर्धन, संगोपन करून लोकांना पर्यटन व्यवसाय उपलब्ध होऊ शकतो.

अनमोल ज्ञान संपुष्टात
नैसर्गिक शेतीबाबत केंद्र शासनाने विशेष पाऊले उचलली आहेत. परंतु या भागात कुटुंबांसाठी पारंपरिक पद्धतीने नैसर्गिक सेंद्रिय शेती केली जाते. अश्या भागात असणारी ही शेतीचे जतन, संवर्धन, संगोपन आणि पुनरुत्थान केल्यास शाश्वत आरोग्याचे आणि जीवनाचे ज्ञान कायम राहील. अनेक औषधी वनस्पती या भागात आढळतात. जुनी मंडळी यांना या बाबत ठाऊक होते. त्यामुळे त्यांची आरोग्याबाबत विशेष तक्रार नसे. अनेक वर्षे याच पद्धतीने निरोगी जीवन जगलेली अनेक माणसं होती. केवळ दुर्लक्ष करून कमी लेखल्याने हे अनमोल ज्ञान संपुष्टात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress review meeting chaos : बिहार निवडणुकीत दारुण पराभवामुळे दिल्लीत काँग्रेसच्या आढावा बैठकीत गोंधळ; नेत्यांमध्ये जोरदार वाद!

Santosh Deshmukh Case: फरार कृष्णा आंधळेच्या शोधाबाबत अहवाल सादर करा; न्यायालयाच्या सूचना; १२ डिसेंबरला आरोप निश्‍चिती शक्य

Pune Police : आंदेकर टोळीने उमरटीतून १५ पिस्तुले विकत घेतली;टोळीवर आणखी एक गुन्हा दाखल होणार!

Ghodegaon Theft : घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या चोरीप्रकरणी दोन आरोपी अटकेत!

Pune New Police Stations : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ; शहरात पाच नवीन पोलिस स्टेशन्स वाढणार, जाणून घ्या कुठे?

SCROLL FOR NEXT