पुणे

बारामतीत घड्याळ विरुद्ध तुतारी पुन्हा लढाई

CD

जिल्ह्यातील सर्वात मोठी व एकमेव अ वर्ग नगरपरिषद म्हणून बारामतीचा नावलौकीक आहे. वीस प्रभागातून ४१ नगरसेवक व नगराध्यक्ष असे ४२ सदस्य नगरपरिषदेत निवडून जाणार आहेत. गेल्या काही वर्षात बारामतीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मोठा निधी आल्याने विकासकामेही वेगाने झाली. भविष्यात देशातील सर्वात सुंदर व स्वच्छ शहर म्हणून बारामतीची गणना व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पवार यांनी जाहीर केलेले असल्याने साहजिकच बारामती नगरपरिषदेचे सदस्य असणे सन्मानाचे ठरणार आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्याही यंदा मोठी होती.

नगराध्यक्षपदासाठी यंदा सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी जोरदार फिल्डींग लावली आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध समविचारी पक्षाच्या विकास आघाडीची प्रामुख्याने लढत होईल, असा अंदाज आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रमुख उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्जच दाखल न करण्याची रणनीती खेळल्याने अनेकांना गॅसवरच राहावे लागले.


काही ठिकाणी दिग्गज अपक्ष
अजित पवार हे घड्याळाच्या चिन्हावर ही निवडणूक लढवतील हे निश्चित आहे. दुसरीकडे युगेंद्र पवार यांनी आघाडीच्या दृष्टीने मोट बांधण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसते. वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष, काँग्रेससह समविचारी पक्षांसोबत युती करून ही निवडणूक ताकदीने लढविण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी विरोधी पक्षांची रणनीती आहे. पक्षीय समीकरणापेक्षाही ताकदीचा उमेदवार आपल्या बाजूला असावा, असा प्रयत्न सुरू केला आहे.
अनेक दिग्गज इच्छुकांनी देखील पक्षाने संधी नाही दिली तर अपक्ष म्हणून अर्ज दाखल करून नशीब अजमाविण्याची तयारी सुरू केलेली आहे. आपण किती वर्षे काम केलेले आहे आणि हीच कशी योग्य वेळ आहे, असे इच्छुक पटवून देत आहेत. संधी मिळावी या साठी अनेकांनी मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. पक्षाकडून उमेदवारी मिळेल, या अपेक्षेने अनेकांनी अर्ज दाखल करणे टाळले असले तरी शेवटच्या दिवशी मात्र काही जण अर्ज दाखल करून ठेवणार हेही निश्चित आहे.
गेल्या काही वर्षातील आजपर्यंतचा इतिहास विचारात घेता बारामती नगरपरिषदेवर काही अपक्ष उमेदवारांचा अपवाद वगळता राष्ट्रवादीचेच वर्चस्व राहिलेले आहे. अर्थात पूर्वीच्या निवडणुकीमध्ये एकसंघ राष्ट्रवादी होती, आता दोन राष्ट्रवादी झालेल्या असून त्या एकमेकांविरोधात उभ्या आहेत. घड्याळ विरुद्ध तुतारी अशी नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार का, या कडे बारामतीकरांचे लक्ष आहे.

इच्छुकांचे प्रयत्न सुरूच
राष्ट्रवादीच्या इच्छुकांची संधी मिळविण्यासाठी धावपळ सुरु आहे. प्रस्थापितांना पुन्हा संधी मिळावी, अशी त्यांची अपेक्षा आहे तर नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, अशी नव्या चेहऱ्यांची मागणी आहे. पाच वर्षांसाठी नगराध्यक्षपद असल्याने राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सर्वच इच्छुकांनी आपापल्या परीने आपल्यालाच संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

पुढील राजकीय गणिते ठरणार
गुरुवारपर्यंत अर्ज दाखल करू नका, असे अजित पवारांनी सुचविलेले असल्याने सर्वांचीच थांबण्याची भूमिका घेतली होती. प्रत्यक्षात मुलाखती होऊनही शेवटच्या दिवसापर्यंत अजित पवार यांनी काहीच चित्र स्पष्ट न केल्याने सर्वच जण वाट बघत होते. अर्थात काही प्रभागात संधी दिली नाही तर काही जण अपक्ष म्हणूनही लढतील असे दिसते.


मागील वेळेचे पक्षिय बलाबल
राष्ट्रवादी काँग्रेस- ३५ जागा, अपक्ष- ४ जागा

- नगरसेवक संख्या
- आता- ४१
- मागील- ३९ जागा

- नगराध्यक्ष आरक्षण- सर्वसाधारण वर्गासाठी खुले

स्थानिक प्रमुख प्रश्‍न
- वाहतुकीचा जटील बनलेला प्रश्न
- वाढलेले अतिक्रमण
- उपनगरातील विविध सार्वजनिक समस्या

प्रचारातील प्रमुख मुद्दे
- अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी घरे उभारणार
- सौरउर्जेवरील शहर करणार
- स्वच्छ, सुंदर व हरित बारामतीसाठी प्रयत्न करणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT