पुणे

गट रचनेसाठी संगणकीकृत नकाशांचा वापर

CD

पुणे, ता. १६ : जिल्हा परिषद, पंचायत समितीची प्रभाग रचना (गट, गण) करण्यासाठी अधिसूचना काढली आहे. ही रचना करताना प्रशासनाला संगणकीकृत नकाशांचा वापर करावा लागणार आहे. प्रत्येक घटकासाठी विशिष्ट रंगामध्ये दर्शविले जाणार आहे. याबरोबर निवडणूक विभाग तयार करताना कुठल्याही गावाचे तसेच अनुसूचित जाती, जमातीच्या वस्त्यांचे शक्यतो विभाजन होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.

पुणे जिल्हा परिषदेत तीन वर्षापासून प्रशासक कालावधी सुरू आहे. लांबलेल्या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर ग्रामविकास विभागाने गुरूवारी अधिसूचना जाहीर केली. निवडणुका घेण्यासंदर्भात वारंवार माजी सदस्यांच्या संघटनांकडून राज्य सरकाराकडे पाठपुरावा केला होता. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे निवडणूक घेता येत नसल्याचे उत्तर मिळत होते. अखेर न्यायालयाने सूचना केल्यानंतर प्रशासनाकडून वेगाने निवडणुकीसंदर्भात काम सुरू केले आहे. राज्य शासनाकडून निवडणुकीच्या संदर्भात मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. त्यामध्ये गट आणि गण रचना करताना शक्यतो संगणकीकृत नकाशांचा वापर करण्यास सांगितले आहे. जिल्ह्याचा एकत्रित आणि तालुकानिहाय हे नकाशे तयार केले जातील. शिवाय गट, गणांमधील गावांच्या हद्दी, ग्रामपंचायतींचे नाव, लोकसंख्या, अनुसूचित जातीची, जमातीची लोकसंख्याही दर्शवली जाणार आहे. गट आणि गण रचनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल.

लोकसंख्येची सरासरी...
प्रत्येक गट आणि गणाची रचना करताना जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची एकूण लोकसंख्या भागिले त्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमध्ये जाणारे एकूण सदस्य संख्या या सूत्रानुसार सरासरी लोकसंख्या निश्चित केली जाणार आहे. गट, गणाची लोकसंख्या त्या गट, गणाच्या सरासरी लोकसंख्येच्या दहा टक्के कमी किंवा दहा टक्के जास्त मर्यादेत ठेवता येणार आहे.


दृष्टिक्षेपात
- २०१७ च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची प्रभागरचना विचारात घेऊन कार्यवाही केली जाणार
- रचना करताना भौगोलिक सलगतेचाही विचार होणार
- गट, गणाच्या सीमा या मोठे रस्ते, गल्ली, नदी, नाले, डोंगर, रस्ते फ्लायओव्हरचा विचार करून निश्चित होणार
- लोकसंख्येचे अपवादात्मक परिस्थितीत भौगोलिकतेमुळे गट न फोडल्यामुळे लोकसंख्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर कारण द्यावे लागणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT