पुणे

सर्वांगिण विकासाचा ध्यास घेतलेली बारामतीचे ईरा इंटरनॅशनल स्कूल...

CD

सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेली
बारामतीची ईरा इंटरनॅशनल स्कूल...

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने बाळासाहेब देवळे फाउंडेशनच्या वतीने ईरा इंटरनॅशनल स्कूलची स्थापना करण्यात आली. सन २०१३मध्ये वीस विद्यार्थी व तीन कर्मचारी यांपासून या शाळेचा प्रारंभ झाला. प्री प्रायमरीपासून याची सुरुवात झाली. चार वर्गखोल्यांमधून अध्यापन सुरू झाले. विद्यार्थी व पालकांची मागणी विचारात घेत सन २०१८ मध्ये नवीन टप्पा गाठत ईरा इंटरनॅशनल स्कूलच्या बांधणीचा निर्णय बाळासाहेब देवळे फाउंडेशनच्या सदस्यांनी घेतला. प्री प्रायमरी सोबतच सेकंडरी स्कूलचा विचार करत इमारतीची उभारणी करण्याचा निर्णय झाला.
-मिलिंद संगई, बारामती

आज ईरा किडसमध्ये १२०, तर ईरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये ४०० विद्यार्थी शिक्षण घेतात. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या ५० इतकी आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाळेचे कामकाज चालविण्याचा निर्णय घेतला गेला होता. त्यानुसार ई-लर्निंग व डिजिटल साधनांचा वापर करण्यात येतो. शाळेने प्रत्येक विद्यार्थ्याला गणित आणि विज्ञान विषयासाठी विशेष किट्स दिली आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे ज्ञान प्रॅक्टिकल पद्धतीने प्राप्त होऊ शकते. कोविडच्या काळात अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शालेय शिक्षण थांबवावे लागले, पण संस्थाचालकांनी त्या अडचणींना तोंड देत संकटावर मात करत कामकाज केले व आज शाळेने एक मोठा टप्पा गाठला आहे. विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती आणि विविध आव्हानांमुळे काही विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षण कायम ठेवणे शक्य झाले नाही. मात्र, त्यांना शाळेने कायमचा आधार देत त्यांच्यासाठी योग्य साधनांची व्यवस्था केली.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच व्हिजन
बाळासाहेब देवळे फाउंडेशनचे किशोर देवळे, मकरंद देवळे, योजना देवळे, नेहा देवळे, ओंकार देवळे, पूजा देवळे यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच व्हिजन नजरेसमोर ठेवून वाटचाल सुरू ठेवली आहे. बदलत्या काळाची पावले ओळखून विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देण्यासह त्यांच्यातील कला गुणांना प्रोत्साहन देत त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्न केले जातात.

ईरा इंटरनॅशनल स्कूलची वैशिष्ट्ये
सहा एकर जागेवर शाळा, बास्केटबॉल व इतर खेळांसाठी दोन मैदान उपलब्ध.
ईरा किड्समध्ये वर्षभरात मुलांना १०५ प्रकल्प दिले जातात.
शारीरिक, मानसिक व भावनिक विकासावर लक्ष केंद्रित केले जाते.
सुसज्ज गणित व विज्ञान प्रयोगशाळा उपलब्ध.
ग्रंथालयामध्ये अनेक पुस्तके व संदर्भ ग्रंथ
दरवर्षी विज्ञान प्रदर्शन व वार्षिक समारंभाचे आयोजन होते.
प्रशस्त मैदानावर खेळ खेळले जातात, व्यायामही करून घेतला जातो.
डिजिटल क्लासरूममुळे व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते.
विद्यार्थ्यांसाठी खेळ, कला, शास्त्र व अभ्यासक्रम घेतले जातात.
शालाबाह्य कराटे व नृत्याचा अतिरिक्त तास सुरू
प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी तायक्वांदो स्पर्धेत पदके मिळविली.
गतवर्षापासून स्केटिंग क्रीडा प्रकाराचा समावेश केला.
विविध मान्यवरांना संवादासाठी शाळेत आमंत्रित केले
मृदगंध स्पर्धेत शाळेस पारितोषिक प्राप्त झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT