ज्या गावात आपला जन्म झाला, त्या गावचे आपण देणं लागतो, या सामाजिक बांधिलकीतून बारामती तालुक्यातील सावळ येथे सन २०१३ मध्ये प्रा. सागर मानसिंग आटोळे यांनी वयाच्या २२व्या वर्षी श्री हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी ज्ञानसागर इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना केली. आटोळे यांनी एमए, एमएड, डीएसएम व पीएचडी असे शिक्षण पुणे शहरामध्ये पूर्ण केले आहे. संस्थेने आता राज्य आणि देश पातळीवर आपला ठसा उमटविला आहे.
-समीर बनकर, शिर्सुफळ
जिरायती भागातील सावळ गावामध्ये वडिलांच्या पाच एकर शेतीच्या क्षेत्रावर शैक्षणिक संकुल सुरू केले. तसेच इतरत्र चार शाखा सुरू केल्या. सीबीएसई व एसएससी बोर्ड अभ्यासक्रमाचे अॅकॅडमी पॅटर्ननुसार पूर्ण वेळ शिक्षण व स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणारी शाळा म्हणजे ज्ञानसागर गुरुकुल. ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने राज्य आणि देश पातळीवर आपला ठसा उमटविला आहे.
शाळेतून भारतीय संस्कृतीवर जोपासना
एनसीसी व स्काउट गाइड ही जागतिक चळवळ ज्ञानसागर गुरुकुलमध्ये प्रभावीपणे राबवली जाते. कर्नाटक, राजस्थान, हरियाना, दिल्ली, दक्षिण कोरिया व ऑस्ट्रेलिया अशा अनेक ठिकाणी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थ्यांना सहभागी होऊन महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये सन २०१६ मध्ये दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सुवर्णबाण पुरस्कार, २०१७ साली तालुकास्तरावर उपक्रमशील शाळा पुरस्कार, सन २०१८ मध्ये राजस्थान येथील रिजनल कॅम्पमध्ये एकूण सात स्पर्धेत प्रथम क्रमांक, सन २०१९ मध्ये हरियाना व दिल्ली येथील राष्ट्रीय कार्यक्रमात सहा विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सुवर्णबाण पुरस्कार, सन २०२०-२१ मध्ये मुंबईमध्ये राज्यपालांच्या हस्ते पंतप्रधान ढाल प्राप्त, सन २०२२ मध्ये कर्नाटक येथील आंतरराष्ट्रीय जांबोरीत ज्ञानसागरच्या अठरा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. सन २०२२ मध्ये राजस्थान येथील राष्ट्रीय जांबोरीत ९ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. दक्षिण कोरिया येथे सन २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय स्काउट जांबोरीत महाराष्ट्रातून ज्ञानसागरच्या सात विद्यार्थ्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले. ऑस्ट्रेलिया येथे सन २०२५ मध्ये राष्ट्रीय स्काउट जांबोरीत महाराष्ट्रातून ज्ञानसागरच्या दोन विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. शाळेने एनसीसी (आर्मी व नेव्हल), आरएसपी, स्काउट गाइड मान्यता मिळाल्यानंतर देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
शाळेला प्राप्त पुरस्कार
ज्ञानसागर ही शाळा २०१५ मध्ये ISO ९००१ : २००८ मानांकन प्राप्त आहे. २०१६ मध्ये मलेशिया या ठिकाणी प्रा.सागर आटोळे यांना ‘आदर्श संस्थाचालक’ पुरस्कार, २०१७ मध्ये नवी दिल्ली येथील ‘अलाईट समिती टॉप स्कूल ऑफ इंडिया अॅवॉर्ड’, २०१८ मध्य प्रदेशमध्ये प्रा. आटोळे सर यांना ‘डायनामिक यंग प्रेसिडेन्स’ पुरस्कार मिळाला आहे. २०१९ मध्ये कर्नाटक येथील शिक्षण परिषदेत इंडिया स्टेट बोर्ड स्कूल अॅवॉर्ड, २०२१ मध्ये मुंबईत राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते प्रा. आटोळे यांना ‘आदर्श संस्थाचालक पुरस्कार’, २०२२ मध्ये उत्तर प्रदेशमधील आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेमध्ये ‘डिजिटल स्कूल अॅवॉर्ड’ मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.