पुणे, ता.२५ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये १६ वर्षांखालील मुलांच्या गटात उरळी कांचनचा डॉ.अस्मिता प्रायमरी स्कूल, सिंहगड रस्ता येथील क्लारा ग्लोबल स्कूल, कोंढव्याचे सिंहगड सिटी आणि मांजरी बुद्रुक येथील द कल्याणी स्कूल संघांनी प्रतिस्पर्धी संघाला हरविले.
कोद्रे फार्मच्या मैदानावर हे सामने झाले. पहिल्या सामन्यात डॉ.अस्मिता प्रायमरी स्कूलने एरंडवणेच्या अभिनव इंग्लिश मीडियम स्कूलचा ३६ धावांनी पराभव केला. प्रसाद आमले याने २७ चेंडूंत ६० धावा केल्या. त्याला सामनावीराचा बहुमान मिळाला.
दुसऱ्या सामन्यात क्लारा ग्लोबल स्कूलने सदाशिव पेठेतील एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूलवर २६ धावांनी विजय मिळविला. श्रवण देवासी याने स्फोटक फलंदाजी करत अवघ्या ३६ चेंडूंत ९२ धावा केल्या. श्रवण हाच सामन्याचा मानकरी ठरला.
तिसऱ्या सामन्यात सिंहगड सिटी स्कूलने वाकडच्या विस्डम वर्ल्ड स्कूल संघाला ४४ धावांनी पराभूत केले. विघ्नेश केदारी याने नाबाद अर्धशतक काढले. विघ्नेश हाच सामनावीर ठरला.
चौथ्या सामन्यात मांजरी बुद्रूक येथील द कल्याणी स्कूलने न्यू नऱ्हेच्या ब्लॉसम पब्लिक स्कूलवर ८ गडी राखून मात केली. सामनावीर अथर्व सातव याने २३ चेंडूंत नाबाद ५६ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
ब्लॉसम पब्लिक स्कूल : १० षटकांत ४ बाद १०१ (जयेश बोरकर नाबाद ४२, श्लोक भैरमगडकर नाबाद १३, अनिरुद्ध खेरडकर २-१६, हर्षद सिंगारवेलन १-१४, साकेत गोयल १-३१) पराभूत वि. द कल्याणी स्कूल : ७.२ षटकांत २ बाद १०३ (अथर्व सातव नाबाद ५६, मोक्षत जैन १८, हार्दिक केसरवानी १३, वरद प्रधान १-१९).
डॉ. अस्मिता प्रायमरी स्कूल : १० षटकांत १२४ (प्रसाद आमले नाबाद ६०, देवान मेमाणे ३३, चिन्मय कुलकर्णी १-२३, शर्विल गोसावी १-१३) वि. वि. अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल : १० षटकांत ८८ (शर्विल गोसावी ३०, देवान मेमाणे ३-१५, विवेक जगताप १-७, भुनेश भोर १-१२).
क्लारा ग्लोबल स्कूल : १० षटकांत २ बाद १२७ (श्रवण देवासी नाबाद ९२, ईशान निंगुने १-२७, अन्वय पात्रीकर १-४०) वि. वि. एसपीएम इंग्लिश मीडियम ः १० षटकांत २ बाद ९१ (शिवराज रणनवरे नाबाद २८, अन्वय पात्रीकर नाबाद १३, शिवा अय्यर १-११, पद्मनाभ मुळे १-१५).
सिंहगड सिटी स्कूल : १० षटकांत २ बाद ११४ (विघ्नेश केदारी नाबाद ५१, रणवीर चव्हाण २२, तन्मय हिप्परकर नाबाद १४, पूर्वनिकस के. जे. १-२४) वि. वि. विस्डम वर्ल्ड स्कूल : १० षटकांत ५ बाद ७० (अथर्व चहल २३, पूर्णनिकस के. जे. ११, स्वराज निंबाळकर २-८).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.