पुणे

रमणबाग, अहिल्यादेवी प्रशाला संघाला अजिंक्यपद

CD

पुणे, ता. २७ : शनिवार पेठेतील न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग आणि अहिल्यादेवी प्रशाला संघांनी पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स खो-खो स्पर्धेमध्ये क्रमशः १४ वर्षांखालील मुले व मुलींच्या गटात अजिंक्यपद पटकाविले. फुलगावच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूल व नूमवि (मुलींची) संघांना उपविजेतेपद मिळविले.
टिळक रस्त्यावरील स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा गुरुवारी पार पडली. पुणे जिल्हा खो-खो संघटनेचे खजिनदार व शिवछत्रपती पुरस्कार विजेते जगदीश नानजकर, संघटनेचे सचिव आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडा मार्गदर्शक शिरीन गोडबोले यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक व पदके देऊन गौरविण्यात आले.
मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग संघाने फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूलचा १०-८ अशा गुणफरकाने पराभव केला. वेदांत गायकवाड, श्रीयश महारुडे व प्रणीत सस्ते यांनी अष्टपैलू कामगिरी करत रमणबाग संघाला अजिंक्यपद मिळवून दिले. उपविजेत्या नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूलकडून कर्णधार अतुल पारधी, विहान कोम व दक्ष टोकरे यांनी उत्कृष्ट खेळ केला.
मुलींच्या गटातील अंतिम सामना अटीतटीचा झाला. त्यामध्ये अहिल्यादेवी प्रशालेने नूतन मराठी विद्यालयाचा (नूमवि) १६ -१५ असा अवघ्या एका गुणाने पराभव केला. अहिल्यादेवीच्या अमृता हंगर्गे, समृद्धी शिर्के यांनी शानदार कामगिरी बजावली. तर नूमविच्या शर्वरी मत्रे, श्रावणी मत्रे यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
तत्पूर्वी, तिसऱ्या स्थानासाठी खेळल्या गेलेल्या मुलांच्या सामन्यात एमईएस भावे (मुले) हायस्कूलने विमलाबाई गरवारे प्रशालेचा ५-३ असा पराभव केला. विजयी संघाकडून सागर तांदळे, चिन्मय जोंगळे यांनी आणि गरवारे प्रशालेकडून विश्वजित खराड, आर्यन वाभडे यांनी उत्कृष्ट खेळ केला. मुलींच्या गटात मिलेनियम नॅशनल स्कूलने ब्राँझपदकावर नाव कोरले. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत मिलेनियम स्कूलने विमलाबाई गरवारे प्रशालेवर दोन गुण व साडेचार मिनिटे राखून विजय मिळविला.

उपांत्य फेरीचे निकाल : (मुले) : न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग वि. वि. एमईएस भावे (मुले) हायस्कूल (९-६). नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूल, फुलगाव वि. वि. विमलाबाई गरवारे प्रशाला (९-७). (मुली) : नूमवि (मुलींची) वि. वि. मिलेनियम स्कूल, कर्वेनगर (१२-२), अहिल्यादेवी वि. वि. विमलाबाई गरवारे स्कूल (१५-३).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणमध्ये शाळा बनली कब्रस्तान! JCBने १६० मुलींच्या मृतदेहाचे दफन; अमेरिका म्हणते, जाणीवपूर्वक हल्ला केला नाही

Sanju Samson: संजू सॅमसनवर एका सामन्याची बंदी, IND vs ENG उपांत्य फेरीच्या सामन्याला मुकणार, ICC ची कारवाई? जाणून घ्या नेमकं सत्य

Nagpur News : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना फटका! बेसा येथील उपलांचीवार कुटुंबासह अनेक नागरिक अबुधाबीत अडकले; विमानसेवा रद्द झाल्याने परतीचा प्रवास थांबला

Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण; सुरक्षारक्षकांचा माज कॅमेऱ्यात कैद!

Chandra Grahan: गरोदर महिलांवर ग्रहणाचा खरंच दुष्परिणाम होतो का? अंनिसने केला खुलासा; वाचा सत्य काय...

SCROLL FOR NEXT