पुणे, ता. १९ : जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) विभागामार्फत जागतिक शौचालय दिनानिमित्ताने जिल्ह्यात ‘हमारा शौचालय, हमारा भविष्य’ या विशेष मोहिमेला सुरुवात केली आहे. या मोहिमेला बुधवारी (ता. १९) सुरुवात झाली असून, १० डिसेंबर (मानवी हक्क) पर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली. मोहिमेदरम्यान शाळा, ग्रामसभा, स्वयंसहाय्य गट, युवक मंडळे, निवृत्त सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहभागातून स्वच्छता, आरोग्य, सुरक्षित मलनिस्सारण आणि शौचालय वापराबाबत जनजागृती केली जाणार आहे.
अपूर्ण, जीर्ण किंवा तातडीने दुरुस्तीची गरज असलेल्या सार्वजनिक शौचालयांची नोंद घेऊन तत्काळ दुरुस्तीकामे करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. याशिवाय ग्रामस्थांना स्वतःच्या वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची रंगरंगोटी, सजावट आणि नियमित देखभाल करण्याचे आवाहन केले आहे. ‘‘जिल्हा स्तरावर उत्तम देखभाल व सुशोभीकरण करणाऱ्या गावांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. तर सार्वजनिक शौचालय व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचे सरपंच व पंचायत अधिकाऱ्यांचा १० डिसेंबर २०२५ रोजी गौरव केला जाणार आहे. या अभियानात सर्व ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवावा,’’ असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अप्पासाहेब गुजर यांनी केले आहे.
शौचालय ही केवळ सोयीची सुविधा नसून आरोग्य, प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेची हमी देणारी मूलभूत गरज आहे. त्यामुळे या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावांतील वैयक्तिक तसेच सामुदायिक शौचालयांची तपासणी, दुरुस्ती, देखभाल आणि सुशोभीकरणावर विशेष भर देण्यात येणार आहे.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.