पुणे

उरुळी देवाची येथील समता विद्यालयाला दुहेरी विजेतेपद

CD

पुणे, ता. २९ : उरळी देवाची येथील समता विद्यालयाने १६ वर्षांखालील मुले व मुलींच्या गटात शनिवारी दुहेरी विजेतेपद पटकावून पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्समधील खो-खो स्पर्धेचा शेवटचा दिवस गाजविला. सदाशिव पेठेतील एमईएस भावे (मुलांचे) हायस्कूल आणि कर्वेनगर येथील मिलेनियम नॅशनल स्कूलचे संघ उपविजेते राहिले.
टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडली. भाजप महाराष्ट्र प्रदेश क्रीडा आघाडी संयोजक विजय बनछोडे, महाराष्ट्र शासनाचे तालुका क्रीडा अधिकारी राजेंद्र सापते यांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या व तृतीय स्थानांवरील संघांना चषक आणि पदके देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी पुणे जिल्हा खो-खो संघटनेचे खजिनदार शिवछत्रपती पुरस्कार विजेते जगदीश नानजकर, संघटनेचे सचिव व शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडा मार्गदर्शक शिरीन गोडबोले, आंतरराष्ट्रीय खो-खो पंच नानासाहेब झांबरे आदी उपस्थित होते.
मुलांच्या गटातील अंतिम सामना अतिशय अटीतटीचा झाला. त्यात समता विद्यालयाने सदाशिव पेठेतील एमईएस भावे (मुलांचे) हायस्कूलचा ११-१० असा अवघ्या एका गुणाने पराभव केला. सुयश चव्हाण याने अडीच मिनिटे व यश चंदनकर याने दोन मिनिटे भक्कम बचाव करत संघाच्या विजयात निर्णायक योगदान दिले. पराभूत संघाकडून स्वराज भुवड याने १ मिनिट ५० सेकंद आणि श्री मोरे याने दीड मिनिटे चिवट खेळ करत विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. न्यू इंग्लिश स्कूल, रमणबागने विमलाबाई गरवारे प्रशालेचा ४-२ गुणांनी पराभव करून तिसरे स्थान प्राप्त केले. न्यू इंग्लिश स्कूलकडून अद्वैत सातपुते, सुशांत कोळीने आणि गरवारे प्रशालेकडून वरद चव्हाण, युग मोरे यांनी चमकदार कामगिरी बजावली.
मुलींच्या अंतिम सामन्यात समता विद्यालयाने कर्वेनगर येथील मिलेनियम नॅशनल स्कूलचा ९-४ असा (एक डाव ५ गडी) राखून पराभव केला. गायत्री केंद्रे, प्रतीक्षा मोरे व पूर्वी गायकवाड यांनी अष्टपैलू कामगिरी करत संघाला विजेतेपद मिळवून दिले. मिलेनियमकडून साची वाघ, सौम्या जाधव, सान्वी आमलेने उत्तम खेळ केला. रेणुका स्वरूप प्रशालेने तिसरे स्थान पटकाविले. मुलींमधील विजेत्या समता विद्यालयाच्या संघाला वैभव कुसाळे, आकाश कुसाळे, मयूर परमाले यांचे तर उपविजेत्या मिलेनियम नॅशनल स्कूल संघाला गणेश बिरिंगल यांचे मार्गदर्शन लाभले. तृतीय क्रमांक प्राप्त रेणुका स्वरुप प्रशाला संघाला प्रशिक्षक अविनाश पंढरी यांचे मार्गदर्शन लाभले. मुलांमधील विजेत्या समता विद्यालयाच्या संघाला मयूर परमाळे यांचे, तर उपविजेत्या एमईएस भावे हायस्कूल संघाला श्री खुणे, श्री पटले, श्री बुद्धिहाड व मुख्याध्यापक सायसिंग वसावे यांचे मार्गदर्शन लाभले.

उपांत्य फेरीचे निकाल (मुले) : समता विद्यालय वि. वि. विमलाबाई गरवारे प्रशाला (१०-६) १ डाव ४ गडी. एमईएस भावे (मुलांचे) स्कूल वि. वि. न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग (८-७).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs NAM सामन्यावर पावसाचे ढग; ऑस्ट्रेलियासारखीच पाकिस्तानची अवस्था होणार? नेमकं कसं आहे समीकरण

Railway Loco Pilots: प्रशासनाकडून दबाव, तणावपूर्ण कामकाज अन्...; मुंबई लोकलच्या लोको पायलटांचा सामूहिक VRS अर्ज दाखल

Latest Marathi News Live Update : पंढरपुरात टेम्पो दुचाकीमध्ये भीषण अपघात, तीन जण जखमी

Guru Margi 2026: मिथुन राशीत गुरु मार्गी, सिंह, कन्यासह 5 राशींना लाभेल भाग्य, करिअरमध्ये होणार प्रगती

नीना गुप्ता यांना 'या' कारणामुळे घालावी लागली होती पॅडेड ब्रा! अभिनेत्रीने सांगितला 'चोली के पीछे' चा शॉकिंग किस्सा

SCROLL FOR NEXT