पुणे, ता. २९ : पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स क्रिकेट स्पर्धेच्या १४ वर्षांखालील गटात बंडगार्डन येथील जे. एन. पेटिट टेक्निकल हायस्कूल, हडपसरमधील विस्डम वर्ल्ड स्कूल, उरळी कांचन येथील डॉ. अस्मिता प्रायमरी स्कूल आणि कर्वेनगर येथील मिलेनियम नॅशनल स्कूल यांनी विजय मिळविला. डॉ. अस्मिता प्रायमरीच्या वीरेन आटोलेचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले.
सासवड-बोपोडी रस्त्यावरील ट्रिनिटी महाविद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. पहिल्या सामन्यात जे. एन. पेटिट हायस्कूलने भिलारेवाडी येथील आर्यन्स वर्ल्ड स्कूलवर नऊ गडी राखून मात केली. दुसऱ्या सामन्यात विस्डम वर्ल्ड स्कूलने खराडी येथील कोठारी इंटरनॅशनल स्कूलचा चार गडी राखून पराभव केला. तसेच अन्य सामन्यात उरळी कांचन येथील डॉ. अस्मिता प्रायमरी स्कूलने टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलवर ४२ धावांनी मात केली. सलामीवीर वीरेन आटोळे याने ३८ चेंडूंत नाबाद ९७ धावा केल्या. कर्वेनगर येथील मिलेनियम नॅशनल स्कूलने हडपसर येथील विबग्योर स्कूलवर आठ गडी राखून मात केली. अष्टपैलू खेळीसाठी वीरेन आटोले, ओम धोंडे, ध्रुव जाधव आणि समर्थ पोकळे हे सामनावीर ठरले.
संक्षिप्त धावफलक :
आर्यन्स वर्ल्ड : १० षटकांत ८ बाद ६३ (अर्णव शिंदे ९, अतुल्य कारखिले २-६, ध्रुव जाधव २-१, दक्ष पवार २-१०) पराभूत विरुद्ध जे. एन. पेटिट : ६.४ षटकांत १ बाद ६५ (ध्रुव जाधव नाबाद ३१, अतुल्य कारखिले नाबाद १७, दक्ष दुसाने १–१५).
कोठारी इंटरनॅशनल : १० षटकांत ३ बाद ६७ (अरिहंत शेळके नाबाद १६, रिशी पारेख नाबाद १६, ओम धोंडे २-१०, देवांश केसरी १-१२) पराभूत विस्डम वर्ल्ड : ९.४ षटकांत ६ बाद ६९ (ओम धोंडे १०, अर्चित चौबे २-१३, अरिहंत शेळके १-९).
डॉ. अस्मिता प्रायमरी : १० षटकांत २ बाद ११८ (वीरेन आटोले नाबाद ९७, मिलिंद मोरे १-१०) वि.वि. न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता : १० षटकांत ७ बाद ७६ (अर्णव आंबेकर २५, स्मित चव्हाण २-६, स्वराज चौधरी २-१७).
विबग्योर : १० षटकांत ८ बाद ४१ (प्रसन्न तुपेरे नाबाद १०, शिरीष उपरे २-५, अभी पाठक १-०, सम्राट पोकळे १-४, अरिन सातपुते १-७) पराभूत विरुद्ध मिलेनियम स्कूल : (समर्थ पोकळे १२, जियान नागदा २-९).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.