पुणे

‘जेएनपीटी’, विबग्योर, एसपीएम, ‘आर्यन्स’चे दमदार विजय

CD

पुणे, ता.२८ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स १६ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत
शनिवारी (ता.२९) बंडगार्डनच्या जे.एन.पेटिट टेक्निकल हायस्कूलच्या संघाने पाच गोलांची आतषबाजी करत
भुकूमच्या संस्कृती स्कूलवर दणदणीत विजय मिळविला. जे.एन.पेटिटच्या दक्ष पिल्ले याने अप्रतिम कामगिरी करत चार गोल केले. इतर सामन्यात सदाशिव पेठेतील एसपीएम इंग्लिश स्कूल, हडपसरचा विबग्योर आणि वारजेतील आर्यन्स स्कूलच्या संघांनी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले.
भारती विद्यापीठाच्या फुटबॉल मैदानावर ही स्पर्धा खेळविण्यात येत आहे. पहिल्या सामन्यात भोसरीच्या मास्टर माईंड ग्लोबल इंग्लिश सेकंडरी स्कूलचा मांजरीतील ऑर्किड द इंटरनॅशनल स्कूलने (सीबीएसई) १-० असा विजय मिळविला. त्यात सामन्याच्या सुरुवातील ऑर्किडच्या सूर्यांक सिसोदिया याने संघासाठी विजयी गोल केला. दुसऱ्या सामन्यात ऑर्किडचा हडपसरच्या विबग्योर स्कूलने १-० असा पराभव केला. विबग्योरच्या अबीर यादव याने एका गोलची दमदार नोंद केली. तर जे.एन.पेटिटच्या संघाने संस्कृती स्कूलचा पाच गोलने दारुण पराभव केला. त्यामध्ये जे.एन.पेटिटच्या दक्ष पिल्ले याने सामन्याच्या सुरुवातीपासूनच दमदार गोल करायला सुरुवात केली. त्याने दमदार चार गोल केले, तर दुसरीकडून अद्यान शेख याने एका गोलची नोंद केली. तर वारजेच्या आर्यन्स स्कूलने एरंडवणेच्या अभिनव इंग्लिश मीडियम स्कूलवर २-० असा विजय मिळविला. त्यामध्ये आर्यन्सच्या युवल भोसले याने दुसऱ्या सत्रात एक तर सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला विनय देसाई यांनी प्रत्येकी एकेक गोलांची नोंद केली. तर काही तासाच्या अंतरावर झालेल्या सामन्यात आर्यन्सने वाघोलीच्या माउंट लिटेरा स्कूलचा २-० असा दारुण पराभव केला. आर्यन्सच्या नीरज बिदकन व सोनित मुदुली यांनी प्रत्येकी एक गोल केला.


समर्थ, आदित्यचे दमदार गोल
सदाशिव पेठ येथील एसपीएम इंग्लिश स्कूल आणि तळेगावच्या हचिंग्स स्कूलमध्ये सामना रंगला. यात एसपीएमने २-० असा विजय मिळविला. विजयी संघातील समर्थ सूर्यवंशी याने ८ व्या आणि आदित्य साठे याने १५ व्या मिनिटाला दमदार गोल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Government Job Fraud : एकाच वेळी दोन-दोन सरकारी नोकऱ्या करत होता पठ्ठ्या, ३३ वर्षे घेतला पगार; कोर्टाने सुनावली ७ वर्षांची शिक्षा

हे, भाऊ शोभतात! बांगलादेशचे दोन्ही फलंदाज एका दिशेला, पाकिस्तानच्या खेळाडूंनी काय केलं पाहा Video Viral

Government Stray Dog Policy : शिकवायचं की कुत्री मोजायची? आता भटक्या कुत्र्यांची जबाबदारी शिक्षकांवर? सरकारचा अजब फतवा, काय आहे नेमका प्लॅन?

Latest Marathi News Live Update : एलपीजी गॅस सिलेंडर टंचाईची झळ आता गडचिरोली शहराला

स्टार प्रवाहच्या प्रसिद्ध मालिकेतून अभिनेत्रीची एक्झिट, म्हणाल्या...'गेली दोन वर्ष मी...'

SCROLL FOR NEXT