पुणे

जेनिल पाध्या याचे २९ चेंडूंत तुफानी नाबाद शतक

CD

पुणे, ता. १ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये १६ वर्षांखालील गटात बाजीराव रस्त्यावरील नूतन मराठी विद्यालय (नूमवि), फुलगावचे नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूल, भिलारेवाडीतील आर्यन्स वर्ल्ड स्कूल आणि हडपसरच्या ग्रीनवुड्स स्कूल यांनी सोमवारी (ता.१) विजय मिळविले. ‘आर्यन्स वर्ल्ड’च्या जेनिल पाध्याने केवळ २९ चेंडूंत नाबाद १०३ धावांची तुफानी खेळी केली.
मुंढवा येथील कोद्रे फार्म्स येथे ही स्पर्धा सुरू आहे. पहिल्या सामन्यात आर्यन्स वर्ल्ड स्कूलने दहा षटकांत १७४ धावा करत सिंहगड रस्त्यावरील क्लारा ग्लोबल स्कूलचा तब्बल ११५ धावांनी पराभव केला. शतकवीर जेनिल पाध्या हा सामन्याचा मानकरी ठरला. दुसऱ्या सामन्यात ग्रीनवुड्स स्कूलने कोथरूडच्या बाल शिक्षण मंदिरचा आठ गडी राखून पराभव केला. या सामन्यात नील कावळे सामनावीर ठरला. नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूलने कोंढव्यातील ट्रिनिटी स्कूलवर सात विकेटने मात केला. १८ चेंडूंत ३० धावांच्या खेळीसाठी चैतन्य भोईरला सामनावीराचा बहुमान मिळाला. नूमविने धायरी फाटा येथील नालंदा इंग्लिश मीडियम स्कूलवर दहा विकेटने मात केली. कुणाल कुंभार सामन्याचा मानकरी ठरला.

संक्षिप्त धावफलक
आर्यन्स वर्ल्ड ः १० षटकांत बिनबाद १७४ (जेनिल पाध्या नाबाद १०३, नील अपुणे नाबाद ५६) वि.वि. क्लारा ग्लोबल ः १० षटकांत ५ बाद ५९ (शौर्य मोरे नाबाद ५, श्रावण शेट्टी १-१, शौर्यतन शेट्टी १-३, आर्य गद्रे १-१०).
बाल शिक्षण मंदिर ः १० षटकांत ७ बाद ७२ (प्रतीक केळकर ३१, शौर्य दीक्षित १४, तन्मय मिरकळे ३-४, नील कावळे ३-८) पराभूत विरुद्ध ग्रीनवुड्स ः ८.४ षटकांत २ बाद ७३ (संग्राम तुपे नाबाद २४, यश मदाने १८, आरुष चौधरी १-५, प्रतीक केळकर १-१३). ट्रिनिटी ः १० षटकांत ३ बाद ८२ (गुरु राजोळे नाबाद ४१, सक्षम कावळे १५, श्रेयश गायकवाड १-१५, साईराज भांबुरे १-१६) पराभूत विरुद्ध नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी ः ९.४ षटकांत ३ बाद ८३ (चैतन्य भोईर ३०, वेदांत शिंदे नाबाद १८, ईशान अरनेजा १-१०, गुरू राजोळे १-१७, समर्थ कोळसे १-१८). नालंदा ः ८ षटकांत २ बाद ५३ (यश गांडे नाबाद २३) पराभूत विरुद्ध नूमवि ः ४.२ षटकांत बिनबाद ५४ (कुणाल कुंभार नाबाद २६, श्रविल शेवाळे नाबाद १४).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणच्या हल्ल्यातून थोडक्यात वाचला ध्रुव राठी, पहाटे दुबई विमानतळावरून केलं होतं उड्डाण, कुटुंबीय अजूनही अडकलेले

Iran-Israel War: खामेनेई यांचं भारतातल्या 'या' गावाशी होतं खास कनेक्शन; मृत्यूची बातमी कळताच गावावर शोककळा

भाजप की राष्ट्रवादी? अमरावती मनपाच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे? 'या' दिवशी होणार निर्णय, सभापती पदासाठी महायुतीत चढाओढ

Ajit Pawar: बारामती वैद्यकीय रुग्णालयास अजित पवार यांचे नाव; राज्य शासनाने घेतला निर्णय

Video : 'असा' झाला शुभविवाह मालिकेचा शेवट ! अभिनेत्रीने शेअर केले Behind The Scene

SCROLL FOR NEXT