पुणे

मुलींच्या फुटबॉल स्पर्धेमध्ये आज ठरणार विजेते

CD

पुणे, ता.३ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी (ता.४) १४ आणि १६ वर्षांखालील मुलींच्‍या अंतिम सामने पार पडणार आहेत. १४ वर्षांखालील गटामध्ये चिंचवडचे एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल आणि एरंडवणेच्या डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलमध्ये अंतिम सामना रंगणार आहे.
भारती विद्यापीठाच्या फुटबॉल मैदानावर मुलींच्‍या फुटबॉल स्पर्धेला बुधवारी (ता.३) सुरुवात झाली. १४ वर्षांखालील गटामध्ये पहिल्या सामन्यात भुकूम येथील इंडस इंटरनॅशनल स्कूलने शिवणेच्या वॉलनट स्कूलचा ३ -० असा पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीलच ‘इंड्स’च्या आलिया गोयल हिने पहिला गोल केला, तर वियांका जेसवानी हिने १३ आणि २० व्या मिनिटाला एकेक गोलची नोंद करत संघाला विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सामन्यात बालेवाडीच्या सी.एम इंटरनॅशनल स्कूलने एरंडवणेच्या अभिनव इंग्लिश मीडियम स्कूलचा ५ -० असा दारुण पराभव केला. विजयी संघाच्या अनुष्का परांडेकर हिने गोलची हॅटट्रिक नोंदविली. तर आरोही शर्मा, आराध्या कदम यांनी एकेक गोलची नोंद केली. दरम्यान, उपांत्यपूर्वच्या सामन्यात एरंडवणे डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलच्या संघाने हांडेवाडी येथील एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल संघाला ३- ० अशी मात देत उपांत्य फेरीत प्रवेश केला. अन्विता गुप्ता, आराध्या नेवरे व रुचिका पाटील यांनी प्रत्येकी एकेक गोलची नोंद केली. तर दुसऱ्या उपांत्यपूर्वच्या सामन्यात एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलने भुकूमच्या ‘इंड्स इंटरनॅशनल’वर २-० असा विजय मिळविला. एल्प्रोच्या आहाना पाटील आणि आराध्या चवरे यांनी एकेक गोलची नोंद केली. तर उपांत्य सामन्यात ‘एल्प्रो इंटरनॅशनल’च्या संघाने ‘सी.एम इंटरनॅशनल’चा पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-३ असा पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलने आगरकरनगर येथील सेंट हेलेनाज स्कूलवर पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-१ असा विजय मिळविला.

लोकसेवा, ‘सी.एम.’चे दमदार विजय
मुलींच्या १६ वर्षांखालील गटात भोसरीच्या मास्टर माईंड ग्लोबल स्कूलने भारती विद्यापीठ स्कूलचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-२ असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात फुलगावच्या लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलने एरंडवणे येथील अभिनव इंग्लिश मीडियम स्कूलवर ४ -० असा दमदार विजय मिळविला. धनश्री पाटील, समिधा पाटील, प्रीती गवळी, गौरी अहिरे यांनी प्रत्येकी एकेक गोलची नोंद केली. बालेवाडीच्या सी.एम इंटरनॅशनल स्कूलने भिलारेवाडी येथील आर्यन्स वर्ल्ड स्कूलचा ५ -० असा दारुण पराभव केला. समिधा पाटील, प्रिशा शाह यांनी प्रत्येकी दोन, तर क्षिती जोशी हिने एक गोलची नोंद केली. तर वाकडच्या इंदिरा नॅशनल स्कूलने कोंढव्यातील मनसुखभाई कोठारी नॅशनल स्कूलवर १-० असा विजय मिळविला. श्रुती खंडागळे हिने विजयी गोलची नोंद केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Nashik Railway : रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती: पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार; पहिल्या टप्प्यात ८,९७० कोटींचा खर्च

Excise Law: सिगारेटसह पान मसाल्याच्या किमती वाढणार! लोकसभेत मोठा निर्णय; हे विधेयक का आणले गेले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील सर्व शाळा उद्या बंद

Malegaon News : घरकुल लाभार्थ्यांचे सुमारे सहा कोटी रुपये थकले; प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान हिशोब विभागाच्या दिरंगाईमुळे रखडले

Viral Video: 'सनम तेरी कसम...' गाण्यावर डान्स करणाऱ्या नव वधु-वराचा व्हिडिओ तुफान व्हायरल, यूजर्सच्या मजेदार कमेंटचा पाऊस

SCROLL FOR NEXT