पुणे

पुनावळे–ताथवडे–वाकडसाठी रेश्मा भुजबळ यांचा विश्वासार्ह पर्याय

CD

लेख वाचन २

सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेणारी विकासाची नवी दिशा
पुनावळे-ताथवडे-वाकडसाठी रेश्मा भुजबळ यांचा विश्वासार्ह पर्याय

पुनावळे, ताथवडे आणि वाकड हा परिसर गेल्या काही वर्षांत झपाट्याने शहरीकरणाकडे वाटचाल करीत आहे. मोठमोठे प्रकल्प, आयटी हब, निवासी संकुले, व्यापारी केंद्रांमुळे या भागाची ओळख बदलत चालली आहे. मात्र, वेगवान विकासाबरोबरच मूलभूत सुविधा, नियोजनबद्ध पायाभूत सुविधा आणि स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील नेतृत्व ही काळाची गरज बनली आहे. अशा निर्णायक टप्प्यावर या प्रभागाला विश्वासार्ह, अनुभवी आणि सामाजिक बांधिलकी असलेले नेतृत्व मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये सौ. रेश्मा चेतन भुजबळ यांचे नाव आघाडीवर आहे.

हीच गरज लक्षात घेता, शिक्षण मंडळाचे माजी सभापती तथा श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक आणि पुनावळे गावाच्या विकासासाठी सातत्याने झटणारे चेतनजी भुजबळ यांच्या सुविद्य पत्नी सौ. रेश्मा चेतन भुजबळ या प्रभाग क्रमांक २५ मधून महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

सामाजिक कार्याची मजबूत पार्श्वभूमी :

भुजबळ कुटुंब हे केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता समाजकारण, शिक्षण, शेती आणि नागरिकांच्या प्रश्नांशी पूर्वीपासूनच थेट जोडलेले आहे. चेतनजी भुजबळ यांनी गेल्या अनेक वर्षांत पुनावळे परिसरासाठी संघर्ष, आंदोलन, पाठपुरावा आणि जी विकासकामे केली, त्याची साक्ष आज परिसरातील रस्ते, शाळा, संगणक लॅब, सांस्कृतिक उपक्रम, वाचनालय, संगणक प्रशिक्षण, युवकांसाठी उपक्रम आणि नागरिकांसाठी सार्वजनिक कार्यक्रम देतात. याच सामाजिक वातावरणात रेश्मा भुजबळ यांची घडण झाली आहे. घराघरातील प्रश्न, महिलांचे प्रश्न, मुलांचे शिक्षण, ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा आणि युवकांच्या संधी यांचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव आहे. त्या केवळ ‘नेतृत्वाची पत्नी’ म्हणून नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेली, कुटुंबवत्सल आणि संवेदनशील महिला म्हणून नागरिकांमध्ये परिचित आहेत. विकासाची दृष्टी - केवळ आश्वासने नव्हे, कृतीचा वारसा या परिसरातील नागरिकांनी गेल्या काही वर्षांत अनेक विकासकामे प्रत्यक्ष अनुभवली आहेत. महिला सक्षमीकरणासाठी आणखी ठामपणे काम करण्याचा निर्धार रेश्मा भुजबळ व्यक्त करतात. सामाजिक कार्याचा वारसा आणि प्रशासनाशी संवादाचा अनुभव आणखी पुढे जाणार आहे, असा विश्वास रेश्मा भुजबळ व्यक्त करतात.

डी.पी. रस्त्यांचे काम आणि केलेला पाठपुरावा :
- वाहतूक कोंडीसारख्या समस्येवर आमदार, महापालिका आयुक्त व अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त पाहणी
- प्रस्तावित कचरा डेपोविरोधात थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेले निवेदन
- शालेय विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट संगणक लॅब
- मोफत संगणक प्रशिक्षण उपक्रम
- सांस्कृतिक कार्यक्रम, वाचनालय, युवक व महिलांसाठी उपक्रम


महिलांचे सशक्तीकरण आणि सुरक्षिततेवर भर
- एक महिला उमेदवार म्हणून रेश्मा भुजबळ यांची भूमिका केवळ प्रतिनिधित्वापुरती मर्यादित नाही, तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी झटणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
- महिलांसाठी सुरक्षित रस्ते व प्रकाशयोजना
- महिला बचत गटांना प्रोत्साहन
- मुलींच्या शिक्षणासाठी विशेष उपक्रम
- आरोग्य, स्वच्छता आणि बालकल्याण यावर लक्ष


मतदारांशी नाते-विश्वासाचे, कामाचे आणि संवादाचे
‘लोकप्रतिनिधी म्हणजे फक्त निवडणुकीपुरते नाही, तर पाचही वर्षे नागरिकांच्या सोबत उभे राहणारे नेतृत्व’- हीच भूमिका रेश्मा भुजबळ यांची आहे. भुजबळ कुटुंबाने कधीही लोकांपासून दुरावलेले राजकारण केले नाही. मॉर्निंग वॉकपासून ते कार्यक्रम, बैठका, पाहणी दौरे, आंदोलन आणि सण-समारंभापर्यंत नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची परंपरा त्यांनी जपली आहे.

नागरिकांनी संधी द्यावी
पुनावळे-ताथवडे-वाकड प्रभागासाठी ही निवडणूक केवळ उमेदवार निवडण्याची नसून भविष्यातील नियोजनबद्ध विकास, सुरक्षितता आणि गुणवत्तापूर्ण जीवनशैलीची दिशा ठरवणारी आहे. अनुभवाचा वारसा, सामाजिक बांधिलकी, विकासाची स्पष्ट दृष्टी आणि संवेदनशील नेतृत्व - या सर्व गुणांची सांगड म्हणजे सौ. रेश्मा चेतन भुजबळ. यावेळी मतदारांनी विकासाला, विश्वासाला आणि कामाच्या वारशाला संधी द्यावी, ही अपेक्षा.


कुटुंबातून मिळालेला राजकारणाचा वारसा जपणारी अनेक उदाहरणे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर दिसतात. मात्र, वारसा राजकारणाचा असला, तरी त्याला खऱ्या अर्थाने समाजकारणाची जोड देणारे तुरळक असतात. पुनावळे गावातील चेतन भुजबळ हे अशा दुर्मिळ उदाहरणांपैकी एक आहेत. आई-वडिलांकडून मिळालेला राजकीय वारसा तर त्यांनी पुढे चालविलाच, पण यथाशक्ती त्यामध्ये सकारात्मक भर घातली. गावाचा समावेश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत झाल्यानंतर, गावाच्या विकासासाठी त्यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद तर आहेतच, पण गावाच्या दीर्घकालीन हिताचेही आहेत.
महाविद्यालयीन जीवनापासून सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे, घरातील राजकीय पार्श्वभूमीचा वारसा जपणारे, विद्यार्थी चळवळीचा अनुभव असणारे, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची जाणीव असणारे युवा नेते म्हणून चेतन भुजबळ हे नाव सुपरिचित आहे. पुनवळे गावाच्या विकास प्रक्रियेत त्यांचे मोठे योगदान आहे.
भुजबळ कुटुंबाची पुनावळे गावात मोठी शेतजमीन आहे. शेती हाच उत्पन्नाचा एकमेव स्रोत असला, की बहुसंख्य कुटुंबांची असते तशीच ‘सुखी’, अशीच कौटुंबिक परिस्थिती होती. परिस्थिती जेमतेम असली, तरी फारशी संघर्षमय नव्हती. चैनीसाठी पैसे नसले, तरी दोन वेळच्या खाण्याला कमी नव्हती. चेतन यांचे शालेय शिक्षण तळेगाव दाभाडे येथील रामभाऊ परूळेकर विद्यालय या निवासी शाळेत झाले. पुनावळे गावातून इतर गावांना जाण्यासाठी पुरेशी वाहतूक सुविधा नसल्यामुळे त्यांना संपूर्ण शिक्षण निवासी शाळेत घ्यावे लागले.

राजकीय आणि सामाजिक वारसा
चेतन यांचे वडील हुशार भुजबळ हे पुनावळे गावचे सरपंच असल्यामुळे समाजसेवेची आवड त्यांना लहानपणापासूनच होती. त्यांच्या आई सौ. मालती भुजबळ या पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आहेत. घरात राजकीय वारसा होताच. सामाजिक कार्याचे बाळकडूही आई-वडिलांकडून मिळाल्याने विद्यालयीन शिक्षण घेत असतानाच चेतन यांनी वेगवेगळ्या विद्यार्थी चळवळींचे नेतृत्व केले. त्यांच्या सामाजिक जीवनाची सुरुवात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व (कै.) लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली झाली. माजी खासदार नानासाहेब नवले यांनी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यावर चेतन भुजबळ यांना संधी दिली. तेथे त्यांना शेतकऱ्यांसाठी काम करता आले.

बांधकाम व्यवसायात पदार्पण
चेतन भुजबळ यांनी महाविद्यालयीन शिक्षणानंतर घरच्या शेतीबरोबरच बांधकाम व्यवसाय सुरू केला. मात्र, शेती हा त्यांचा आवडता व्यवसाय असल्याने ते श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यामार्फत शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक शेतीविषयी विविध उपक्रम राबवितात. शेतीबरोबरच समाजसेवेत जास्त रस असल्यामुळे व्यवसायापेक्षाही सामाजिक कार्याला प्राधान्य देण्याकडे त्यांचा कल असतो. त्यांनी वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी राजकारण व समाजकारणात प्रवेश केला. शालेय जीवनापासून समाजकारणाची आवड असल्यामुळे व कौटुंबिक वारसामुळे विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची त्यांना जाण होती. शालेय जीवनापासून विद्यार्थी संघटनेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांच्या समाजकारणाला व राजकारणाला भक्कम पाया मिळाला.

पुनावळे गावाच्या विकासासाठी संघर्ष
राजकीय व सामाजिक नेतृत्व करीत असताना पुनावळे गावाच्या हितासाठी चेतन भुजबळ यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. गावातील विकास कामांसाठी, तसेच कचरा डेपोसाठी त्यांनी मोठी आंदोलने उभारण्यात यश मिळविले. पुनावळे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. सन १९९७ मध्ये पिंपरी- चिंचवड महापालिकेत १८ गावे नव्याने समाविष्ट झाली, त्यात पुनावळे गावाचा समावेश होता. त्यावेळी गावातील विविध कामांसाठी त्यांना पिंपरी महापालिकेकडे पाठपुरावा करावा लागला. सार्वजनिक जीवनात काम करीत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. कचरा डेपोसारख्या प्रश्नावर खूप वर्षांनंतर यश मिळाले. पुनावळे गावाचा समावेश पिंपरी महापालिकेमध्ये झाला असला, तरी प्राथमिक सुविधांसाठी खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला.

सार्वजनिक जीवनातील निर्णायक क्षण
चेतन भुजबळ यांनी शिक्षण मंडळाचे सभापतिपद भूषविले. त्यावेळी पिंपरी महापालिकेच्या प्रत्येक शाळेमध्ये स्मार्ट कॉम्प्युटर लॅब करणे, तसेच शालेय विद्यार्थ्यांना वेळेत शालेय वस्तूंचे वाटप करणे, यासाठी त्यांनी केलेल्या उपयोजनांचे सर्व स्तरांतून कौतुक झाले. हा काळ त्यांच्या जीवनाला निर्णायक वळण देणारा ठरला. आपण करीत असलेले समाजकारण व राजकारण योग्य दिशेने सुरू आहे ना, हे पाहण्याचीच नव्हे, तर ते पारखण्याची संधी या निमित्ताने त्यांना मिळाली.

आव्हाने जाणून कार्यपद्धतीत बदल
चेतन भुजबळ यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी काळाची आव्हाने, सातत्याने होणारे बदल मोकळ्या मनाने स्वीकारून, आपल्या व्यवसायात तसेच राजकीय व सामाजिक जीवनातही वेळोवेळी योग्य ते बदल अंगीकारले. सामाजिक जीवनात काम करीत असताना अनेक चढउतार येणे अपरिहार्य असते. समाजाच्या गरजा, अपेक्षांमध्येही बदल होतात. त्यानुसार कामामध्ये, कार्यशैलीमध्ये बदल करावे लागतात. सामाजिक कार्याबरोबरच वैयक्तिक कार्याचा समतोल राखण्याचा प्रयत्न करीत राहणे गरजेचे असते, असे ते मानतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC निवडणुकांचा फटका मुंबईकरांच्या आरोग्याला! ८०% कर्मचारी निवडणूक ड्युटीवर, मतदान महत्त्वाचे की उपचार?

Latest Marathi News Live Update : रंगशारदा येथे भाजप आणि शिवसेना नेत्यांची होणार बैठक

Viral Video: ''ले बेटा.. किरीश का सुनेगा गाना'', तुम्ही व्हिडीओ बघितला का? कोण आहे तो व्हायरल बॉय?

Akola Political : अकोल्यात भाजप व काँग्रेसची ‘बार्गेनिंग’ वाढली; फॉर्म्युला ठरेना; उमेदवारांची धाकधुक वाढली!

Dream Job Loss: अपयश नाही, नवी संधी! स्वप्नातील नोकरी गेल्यावर नव्याने सुरुवात कशी कराल? 'या' टिप्स फॉलो करा

SCROLL FOR NEXT