पुणे

विद्यार्थ्यांसाठी ‘सकाळ एनआयई’ अंक उपयुक्त : प्रतीक चन्नावार

CD

जुन्नर, ता. २२ : वाचन कौशल्ये विकसित करण्यासाठी ‘सकाळ एनआयई’ अंक उपयुक्त असून अवांतर वाचनासाठी सर्वच विद्यार्थ्यांनी त्याचे वाचन केले पाहिजे. ‘सकाळ एनआयई’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत मिळणार आहे. ‘सकाळ व टाटा मोटर्स विद्याधनम’ यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध होत आहे. वाचन कौशल्याला वाव देणाऱ्या उपक्रमात सर्वच विद्यार्थ्यांनी सहभागी झाले पाहिजे, असे प्रतिपादन पंचायत समिती जुन्नर तालुका गटविकास अधिकारी (उच्च श्रेणी) प्रतीक चन्नावार यांनी केले.

‘सकाळ’ माध्यम समूहाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘सकाळ एनआयई’ या उपक्रमाची सुरवात जुन्नर येथील पंचायत समिती सभागृहात झाली. त्यावेळी उपस्थित केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी व मुख्याध्यापक यांचेशी संवाद साधताना ते बोलत होते. या वेळी पंचायत समिती जुन्नर तालुका गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे, बालविकास प्रकल्प अधिकारी किशोर पगारे, डाएट अधिव्याख्यात्या राजश्री तिटकारे, शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे, अशोक गोडसे, वंदना शिंदे, देवराम गवारी, केंद्रप्रमुख बाळासाहेब भालेकर, वामन शेळके, दुंदा भालिंगे, अशोक पारधी, अन्वर सय्यद, संतोष चिलप, मुख्याध्यापक अशोक काकडे, गोपाळ औटी, विशेष शिक्षक संगीता डोंगरे, रवींद्र तोरणे, राजेंद्र पुंडे, उमेश गवळी उपस्थित होते. जुन्नर तालुक्यातील पंचवीस शाळांमधील विद्यार्थ्यांना या अंकाचा वाचनासाठी लाभ मिळणार आहे. ‘टाटा मोटर्स विद्याधनम’ व योजक संस्था यांच्या विशेष सहकार्याने तो राबविला जाणार आहे. टाटा मोटर्स विद्याधनमच्या माध्यमातून विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जात असून विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्याला वाव देण्यासाठी यात सहभागी शाळांमध्ये ‘सकाळ एनआयई’ अंकाचे वितरण करण्यात येणार आहे. ‘सकाळ एनआयई’चे व्यवस्थापक विशाल सराफ यांनी उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.


‘सकाळ’ माध्यम समूहाचे सर्वच उपक्रम स्तुत्य असतात. ‘सकाळ एनआयई’ अंकाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाचे साधन प्राप्त होणार आहे. विद्यार्थ्यांनी या अंकाचे आवर्जून वाचन करावे. उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा.
- प्रतीक चन्नावार, गटविकास अधिकारी, (उच्च श्रेणी) पंचायत समिती जुन्नर तालुका

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ‘सकाळ एनआयई’ उपक्रमाच्या माध्यमातून अवांतर वाचनाची गोडी निर्माण होण्यास मदत मिळणार असून रंगीत स्वरूपातील हा अंक सर्वच विद्यार्थ्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. ‘सकाळ’ माध्यम समूहाचे व टाटा मोटर्स, पिंपरी यांचे विशेष आभार. या उपक्रमास आमच्या सर्व केंद्र प्रमुखांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल.
- अशोक लांडे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती जुन्नर तालुका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Student Video: बोटांमध्ये चावी फिरवत वर्गातून बाहेर पडली, नंतर थेट मुलीनं शाळेत चौथ्या मजल्यावरून उडी मारली, पाहा थरारक व्हिडिओ

Walmik Karad: ''धनंजय मुंडेंना आयुष्यातून उठवून मंत्रिपदाची शपथ घेणार होता वाल्मिक कराड'', बाळा बांगरचा रेकॉर्डिंग बॉम्ब

IND vs ENG 4th Test: 'Root' मजबूत! जो रूटचे ३८वे शतक; भारतीय गोलंदाजांची घेतली शाळा, मोडले अनेक विक्रम

Pune: पुण्यातील मोठ्या धरणाच्या पाण्याला हिरवा रंग, लोकांमध्ये भीतीचं वातावरण, धक्कादायक कारण समोर

Latest Maharashtra News Updates : माणिकराव कोकाटे यांच्या समर्थनार्थ सिन्नरमध्ये शक्तीप्रदर्शन

SCROLL FOR NEXT