पुणे

वडील आणि स्तनपान

CD

स्तनपान जनजागृती सप्ताह

वडील आणि स्तनपान
इंट्रो ः प्रिय वडिलांनो, स्तनपान ही केवळ आईची जबाबदारी नाही; तर तुमचंही प्रेम, आधार आणि सहभाग या प्रवासाला पूरक ठरतात. पुढे या, साथ द्या. कारण, बाळ फक्त आईचे नाही. तुमचंही आहे. लक्षात घ्या, बाळाबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण हा अनमोल असतो. स्तनपानाच्या यशस्वीतेमागे आईचा शारीरिक आणि मानसिक समतोल जितका गरजेचा आहे. तितकाच वडिलांचा सक्रिय पाठिंबा देखील गरजेचा आहे. वडिलांनी केवळ सहानुभूती नव्हे; तर सहभाग दाखवून मातेला विश्वास, आधार आणि मदत दिल्यास बाळाचे आरोग्य आणि कुटुंबातली समृद्धी दोन्ही नक्कीच वाढतील.
-------------
डॉ. पूजा देखणे (बालमानस तज्ज्ञ), डॉ. पूजा पडबिद्री (निओनेटल थेरपिस्ट), डी. वाय. पाटील हॉस्पिटल, पिंपरी

भारतीय संस्कृतीत स्तनपानाला अत्यंत पवित्र, नैसर्गिक आणि मातृत्वाच्या मूळ प्रतिकाप्रमाणे मानले गेले आहे. चरक संहिता व सुश्रुत संहिता या प्राचीन आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये स्तनपानाला अन्नाचा सर्वोत्तम स्रोत मानले आहे. पहिले सहा महिने ‘एकस्तन्योपजीविनः शिशवः’ म्हणजेच बाळासाठी एकमेव अन्न म्हणजे स्तन्य असे सांगितले आहे. मात्र मातृत्वासोबतच पितृत्व देखील बाळाच्या संगोपनात तितकेच महत्त्वाचे आहे. स्तनपानाच्या प्रक्रियेमध्ये वडिलांचा भावनिक, मानसिक आणि प्रत्यक्ष सहभाग हे आईसाठी आधाराचे स्रोत ठरू शकतात. आधुनिक पालकत्वात वडिलांची भूमिका सहभागी आणि सजग संगोपक म्हणून बदलत आहे.

दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्तनपान जनजागृती सप्ताह साजरा केला जातो. यावर्षीचा विषय आहे ‘शाश्वत पाठिंबा व्यवस्था निर्माण करणे’. आतापर्यंत झालेले संशोधन दर्शवते की वडिलांनी गर्भधारणेपासून बाळाच्या जन्मापर्यंत सक्रिय सहभाग घेतल्यास त्यांचा बाळाशी बंध अधिक दृढ होतो. वडिलांना स्तनपानाविषयी शिक्षित केल्यास आणि त्यांनी याविषयी पत्नीला पाठिंबा दिल्यास फक्त स्तनपान दर वाढत नाही; तर या प्रक्रियेला एक सामान्य, नैसर्गिक भाग म्हणून स्वीकारणं सोपे जाते.
बाळाचे बरोबर लॅच न होणे, वेदना होणे, दूध कमी येणे इत्यादी मानसिक ताणतणावामुळे दुधाचे उत्पादन आणि स्तनपानाच्या प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम होतो. दुधाचे प्रमाण कमी होऊ शकते आणि स्तनपानाचा कालावधी कमी होऊ शकतो. अशा अस्वस्थ काळात आईला शांत करणे, तिला समजून घेणे, तिच्या भावनिक गरजा पूर्ण करणे. हे वडील सहजपणे करू शकतात. आईवरचा ताण कमी करणे हेच स्तनपानाला यशस्वी बनवणारे पहिले पाऊल असते. घरात सकारात्मक वातावरण तयार करणे फार गरजेचे आहे.
स्तनपान करताना आई आणि बाळाची स्थिती योग्य प्रकारे साधली नाही; तर आईला पाठदुखीचा त्रास उद्‍भवू शकतो. अशावेळी आईला बसायला किंवा झोपायला मदत करणे, बाळाला योग्य स्थितीत ठेवणे, आईला पाणी, गरम दूध, पौष्टिक आहार देणे, बाळाचे डायपर बदलणे, अंग थोपटणे, ढेकर देणे, झोपवणे, रात्रीच्यावेळी बाळ रडल्यास पहिले लक्ष देणे हे केल्यास वडिलांचा आत्मविश्वासही वाढतो आणि त्यांचे बाळाशी नाते घट्ट होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump accuses India :''रशियाकडून तेल खरेदी करून भारत कमावतोय नफा'' ट्रम्प यांचा आरोप; अन् टॅरिफ वाढवण्याचीही धमकी!

Mumbai Weather: उकाड्यामुळे मुंबईकर हैराण! आता पाऊस कधी दरवाजा ठोठावणार? हवामान विभागाने वेळच सांगितली

Mumbai News: कबुतरखाना कारवाईविरोधात जैन समाज आक्रमक, उपोषणाचा दिला इशारा

IND vs ENG 5th Test: शुभमन गिलच्या ७५४, तर हॅरी ब्रूकच्या ४८१ धावा, तरीही दोघांना Player Of The Series पुरस्कार कसा? गंभीरचा 'Role'

Latest Marathi News Updates Live : अंजली दमानिया विरोधात वॉरंट जारी

SCROLL FOR NEXT