पुणे

अवकाळीचा शंभर हेक्टरला फटका

CD

पुणे, ता. ४ : जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे शंभर हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केला आहे. यामध्ये प्रामुख्याने भाजीपाला, गहू यांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भागात तातडीने पंचनामे करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षक संजय काचोळे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील द्राक्ष बागांचा हंगाम जवळपास साठ टक्के संपला आहे. शेतात असलेल्या द्राक्षांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. यावर्षी द्राक्षाचा सुरुवातीचा हंगाम चांगला झाला. रोगांचा प्रादुर्भावही कमी झाला आणि बाजारभाव देखील समाधानकारक मिळाला. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी द्राक्षाची छाटणी उशिरा केली, त्यांच्या बागा अवकाळी पावसात सापडल्या आहेत. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सध्या काढणी सुरू असलेल्या कांदा, गहू आणि कोथिंबिरीसह इतर पालेभाजी, फळभाजीला या पावसामुळे फटका बसला आहे. शेतीच्या मशागतीच्या काळात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची कामे काही दिवस खोळंबणार आहेत.

कृषी विभागाकडून नुकसानीचा आढावा
जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचा कृषी विभागाकडून आढावा घेण्यात आला. त्यामध्ये अंदाजे शंभर हेक्टर नुकसान झाले असू शकते असा अंदाज काचोळे यांनी व्यक्त करून पुढील काही दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीची आकडेवारी समोर येईल. पंचनामे तातडीने केले जातील, असेही काचोळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: शिक्षक बदल्यांवरून वाद! भिवंडी शाळांमध्ये पर्यायी नियुक्ती न झाल्याने शिक्षण व्यवस्थेवर ताण

Cruise Accident: आईने मुलाला लाइफ जॅकेटमध्ये कवटाळून ठेवले... पण दोघांचाही श्वास थांबला! क्रूझ दुर्घटनेत हृदय पिळवटून टाकणारा क्षण

पत्नीची साडी प्रेस करून दे म्हणत वसतीगृहातील मुलीला घरी बोलवलं अन् रुमध्ये नेऊन...; सेवानिवृत्त प्राचार्याच गैरकृत्य

IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात वर्ल्ड कप विजेता ऑल राऊंडर दाखल; Shivam Mavi च्या बदली संघात एन्ट्री...

प्रसिद्ध अभिनेत्रीनं दाखवले ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीचे निशाण; म्हणाली ‘हे डाग नाहीत, धैर्याचं प्रतीक आहे’

SCROLL FOR NEXT