पुणे

प्रतिक्रिया

CD

विश्‍वास बसत नाही नेहमी कणखरपणे उभे राहणारे, संकटात धीर देणारे दादा आज अचानक हरपले, ही कल्पनाच असह्य आहे. बारामतीचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं एक मजबूत नेतृत्व आज निघून गेलं. विकास, निर्णयक्षमता आणि सामान्य माणसाशी असलेलं नातं हे दादांचं वेगळेपण होतं.
- मिलिंद कांबळे, उपाध्यक्ष, सोमेश्‍वर सहकारी साखर कारखाना

सहकारातील त्यांचा अनुभव अफाट होता. बँका, साखर कारखाने, दूध संघ असो किंवा ग्रामीण अर्थव्यवस्था प्रत्येक ठिकाणी दादांची नजर ठाम आणि निर्णय दूरदृष्टीचा असायचा. अडचणीत सापडलेल्या संस्थांना उभं करण्याचं धाडस, कर्मचाऱ्यांना दिलेला आधार आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेले कठोर निर्णय हे त्यांचं सहकारातील खरं योगदान आहे. आज दादा नाहीत, पण त्यांनी उभा केलेला सहकाराचा पाया मजबूत आहे. त्या अनुभवाची, मार्गदर्शनाची आणि खंबीर नेतृत्वाची उणीव कायम जाणवेल. सहकार क्षेत्राने एक आधारवड गमावला आहे.
- बापूराव सूर्यवंशी, माजी अध्यक्ष, बारामती दूध संघ


जिल्हा परिषद म्हटलं की दादांचा कामांचा दबदबा डोळ्यांसमोर उभा राहतो. निधी असो वा नसो काम थांबू नये, हीच दादांची भूमिका असायची. रस्ते, पाणीपुरवठा, शाळा, आरोग्य केंद्रे, ग्रामविकासाची कामे एका मागोमाग एक वेगाने सुरू असायची. तो वेग म्हणजेच दादांचा ‘दरारा’ होता. अखंड, प्रखर आणि गावागावात जीवन देणारा. अधिकाऱ्यांना धडकी भरवणारा, पण सामान्य माणसाला दिलासा देणारा हा दबदबा आज थांबला आहे.
- सतीश खोमणे, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद

माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ व जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देण्याचे काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. दादां सारखा नेता पुन्हा बारामतीत कधीच होऊ शकत नाही. आज बारामती शून्य झाली. विकास थांबला असून कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
- विश्‍वास देवकाते, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT