पुणे

ढगाळ हवामानामुळे शेतकरी चिंतातूर

CD

पुणे, ता. २ : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून हवामानात अचानक बदल होत आहे. तापमानात वाढ आणि ढगाळ वातावरण कायम आहे. या बदलत्या परिस्थितीचा थेट परिणाम रब्बी हंगामातील पिकांना फटका बसत आहे. पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. गहू, हरभरा, कांदा, ज्वारी, भाज्या तसेच फळपिकांवर रोगराई पसरण्याचा धोका वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यातील पुरंदर, इंदापूर, दौंड, बारामती, शिरूर, जुन्नर, आंबेगाव, मुळशी, भोर आदी तालुक्यांमध्ये दिवसा तापमान वाढलेले आहे. काही भागांत आर्द्रतेचे प्रमाणही वाढले आहे. अशा परिस्थितीत पिकांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती होऊन किडी आणि बुरशीजन्य रोगांना पोषक वातावरण निर्माण होऊ शकते, असे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रब्बी हंगामातील महत्त्वाची पिके असलेले गहू आणि हरभरा सध्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. तापमान वाढल्यास गव्हावर करपा, तांबेरा, मावा तसेच पानांवरील डागांचे रोग वाढण्याची शक्यता आहे. हरभऱ्यावर अळी, मावा आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. कांदा पिकावर करपा, तुडतुडे यांसारख्या किडी सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पिकांची नियमित पाहणी करणे, रोग किंवा किडीची सुरुवातीची लक्षणे दिसताच कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेणे, तसेच हवामान अंदाजानुसार शेतीच्या कामांचे नियोजन करण्याचे सुचविण्यात आले आहे.

शेतकऱ्यांचा खर्च वाढण्याची भीती
कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यास वारंवार फवारणी करावी लागते, त्यामुळे उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता आहे. अगोदरच खत, बियाणे, मजुरी आणि पाण्याच्या खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही भागांत शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक फवारण्या सुरू केल्या आहेत. पुढील दिवसांत परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. सध्याच्या हवामानात चढ उतार होत आहे. अशा वातावरणात कीडरोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण होते. हा काळ रब्बी पिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने शेतकऱ्यांनी अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. वेळेवर उपाययोजना केल्यास संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते.
- संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

दृष्टिक्षेपात...
रब्बीचे पेरणी झालेले क्षेत्र............१,८८,१५६ हेक्टर
सर्वाधिक ज्वारीची पेरणी............७७,००६ हेक्टर
रब्बी तृणधान्य पेरणी क्षेत्र............१,५६,४११ हेक्टर
कडधान्य घेतलेले क्षेत्र............३१,१४६ हेक्टर
गळीतधान्य असलेले क्षेत्र............६०० हेक्टर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांना म्हाडातून लागलं घर, पण प्रकरण हायकोर्टात; काय दिले निर्देश?

Sant Tukaram Maharaj Beej 2026: संत तुकाराम बीज का साजरी केली जाते अन् तुम्हाला या दिवसाचं महत्त्व माहित आहे का?

Two Killed Electric Shock Hupari : बैलांचा नाद, जिवापाड प्रेम करणाऱ्यारा बैलांना धुताना विजेचा धक्का लागला अन्, हुपरीत दोघांचा जागीच मृत्यू

Nashik Kumbh Mela : 1800 झाडांची कत्तल थांबणार? हायकोर्टाने नाशिक महापालिकेचा 'तो' युक्तिवाद फेटाळला; नेमकं काय घडलं न्यायालयात?

Latest Marathi News Live Update : देहूनगरीत आज संत तुकाराम महाराज यांचा 378 वा बीज सोहळा

SCROLL FOR NEXT