पुणे

अटीतटीच्या लढती

CD

या लढतींच्या निकालाकडे लक्ष

भोर
उत्रोली- कारी या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य आणि एक वेळा पंचायत समिती सदस्य असलेले रणजित शिवतरे आणि भाजपचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार आहे

वेल्हे
विंझर- पानशेत या गटात कॉंग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, भाजपकडून शिवराज शेंडकर, तर राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा बँकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर यांचे चिरंजीव व माजी उपसभापती अनंता दारवटकर हे शिवसेनेकडून लढत आहेत. शिंदे गटात प्रवेश करून शिवसेनेकडून उमेदवारी मिळवत रिंगणात असून राष्ट्रवादीचे नलावडे भाजपाचे शेंडकर तर शिवसेनेकडून दारवटकर यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे.

मुळशी
पिरंगुट- भूगाव गटामध्ये मागील पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून एकत्रित निवडणूक लढविलेले जिल्हा परिषदेचे माजी गटनेते शांताराम इंगवले
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून व मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती महादेव कोंढरे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून रिंगणात आहेत. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आबासाहेब शेळके यांनीही जोरदार लढत दिली आहे. त्यामुळे सुरवातीला दुरंगी वाटणारी लढत तिरंगी झाली.

पुरंदर
बेलसर- माळशिरस जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते यांचे चिरंजीव गौरव कोलते व काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रेय झुरंगे यांच्यासह शिवसेनेचे रमेश इंगळे, भाजपचे अजय इंगळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमोल कामठे यांच्यामध्ये चुरशीची चौरंगी लढत होत आहे.

इंदापूर
वडापुरी- माळवाडी जिल्हा परिषद गटात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांचे चिरंजीव यशराज जगदाळे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक लढवीत असून, या ठिकाणी पूर्वी राष्ट्रवादीचे माजी पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत.

दौंड
केडगाव- बोरीपार्धी गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार रमेश थोरात यांचे चिरंजीव तुषार थोरात व भाजपकडून दिवंगत माजी आमदार काकासाहेब थोरात यांचे नातू तथा भीमा पाटस कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात यांची चिरंजीव अभिषेक थोरात यांच्यामध्ये चुरशीची लढत
होत आहे.

शिरूर
वडगाव रासाई- मांडवगण फराटा गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार, भाजपचे वडगाव रासाई येथील सरपंच सचिन शेलार व घोडगंगा कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे यांच्यामध्ये चुरशीची तिरंगी लढत रंगली होती.

हवेली
खेड शिवापूर- खानापूर गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पांगारे यांच्या पत्नी व माजी जिल्हा परिषद सदस्य पूजा पारगे व शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश कोंडे यांच्या पत्नी रुपाली कोंडे यांच्यामध्ये चुरशीची लढत आहे.

जुन्नर
सावरगाव- कुसुर गटात जिल्हा परिषदेवर सलग चार वेळा निवडून गेलेल्या आशा बुचके या भाजपकडून निवडणूक लढत आहेत. त्यांच्यापुढे या गटाचे गतपंचवार्षिक निवडणुकीतील विजयी उमेदवार
गुलाब पारखे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष चव्हाण हे शिवसेनेकडून व संध्या भगत या मनसेकडून निवडणूक लढत आहेत. या चौरंगी लढतीकडे लक्ष लागले आहे.

आंबेगाव
पारगावतर्फे अवसरी बुद्रुक- जारकरवाडी गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे व शिवसेनेकडून जिल्हा अरुण गिरे यांच्यामध्ये चुरशीची लढत होत आहे. दोघांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे. अरुण गिरे यांनी नुकताच राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा आहे.

खेड
आंबेठाण-पाईट जिल्हा परिषद गटात तब्बल वीस वर्षे हा गट ताब्यात ठेवणारे शरद बुट्टे पाटील यांच्या पत्नी सुनीता बुट्टे पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या भगिनी आणि बाजार समितीचे संचालक अनुराग जैद यांच्या आई राजश्री जैद या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवत आहे. तसेचे शिवसेनेकडून दिवंगत माजी आमदार सुरेश गोरे यांच्या चुलत भावजय निशा गोरे या निवडणूक लढवीत आहे. त्यामुळे येथे तालुक्यातील सर्वाधिक चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IRCTC Launches E-Pantry : ‘आयआरसीटीसी’ने देशभरातील २५ रेल्वेंमध्ये ‘ई-पँट्री’ सेवा करण्याचा घेतला निर्णय!

T20 World Cup SA vs CAN: दक्षिण आफ्रिकेचा सफाईदार विजय; कॅनडाच्या नवनीतने दिली कडवी टक्कर! गुणतालिकेत मोठा बदल

Nationwide Workers Strike : देशभरातील तब्बल ३० कोटी कामगार जाणार संपावर! ; ६०० जिल्ह्यांमधील कामं ठप्प होण्याची चिन्हं

Pune News : कोल्हापूरच्या आदेशाने पुण्यातील निवडणूक बिनविरोध

Shendurwada News : शेंदूरवादा गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुसंडी

SCROLL FOR NEXT