पिंपरी, ता. १४ : डिझेल भरल्याचा मेसेजच्या कारणावरून ट्रेलरचालकाला रॉडने मारहाण करण्यात आली. तर, त्यांच्या दोन मित्रांना काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना निघोजे येथे घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
या घटनेत भरत पालवे (रा. डोंगरवस्ती, निघोजे, मूळ-बीड) यांनी दक्षिण महाळुंगे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी वैद्यनाथ यादव, लवकुश यादव यांना अटक केली आहे. तर ललित यादव आणि अजय यादव (सर्व रा. निघोजे, खेड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे डिझेल भरण्यासाठी निघोजे येथील जय श्रीनाथ पेट्रोल पंपावर गेले असता डिझेल भरल्याबाबतचा मेसेज न आल्याच्या कारणावरून त्यांचा पंपावरील कर्मचाऱ्यांशी वाद झाला. कर्मचारी ललित यादव याने शिवीगाळ केली. तर, त्याचा भाऊ वैजनाथ याने मारहाण केली. हा वाद मिटल्यानंतर फिर्यादी मित्रांसह हॉटेलमध्ये गेले असताना ललित व वैजनाथ हे शिवीगाळ करून निघून गेले. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी व त्यांचे मित्र नरेश काळे व रोहित काळे हे पेट्रोल पंपावर गेले असता, आरोपींनी मारहाण केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.