यात एखादा रुग्ण किंवा त्याच्या नातेवाइकाचा कोट असावा. योजनेतून उपचार घेण्यात अडथळे आहेत, असे आपण म्हणत असू, तर त्याचे उदाहरण देता येईल.
---------------
पिंपरी, ता. १७ : ‘आयुष्मान भारत’ योजनेच्या कार्डअभावी रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रामुख्याने कार्ड नसणे किंवा तांत्रिक अडचणींमुळे उपचारात अडथळे सहन करावे लागत आहेत. तर, अनेक व्यक्ती पात्र असूनही त्यांनी हे कार्ड काढलेले नाही.
‘आयुष्मान भारत’ योजनेतून पात्र रुग्णाला पाच लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार पुरवले जातात. त्याचा खर्च शासनामार्फत रुग्णालयाला दिला जातो. महाराष्ट्रात ही योजना ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि राज्य सरकारची ‘महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना’ यांच्या एकत्रीकरणातून राबविण्यात येते. यासाठी शिधापत्रिका, आधारकार्ड व उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे लागतात. शहरातील महापालिकेच्या आठ मोठ्या रुग्णालयांसह काही खासगी रुग्णालयांत योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. दरम्यान, काही जणांकडे हे कार्ड असूनही ‘ई-केवायसी’ प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना उपचार घेण्यात अडथळे येत आहेत.
प्रमुख अडचणी
- आयुष्मान भारत आणि महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेचा ‘सर्व्हर डाऊन’ असल्याने उपचारांसाठी मंजुरी मिळण्यात अडचणी
- काही खासगी रुग्णालये या योजनेच्या पॅनेलवर असूनही, कार्ड स्वीकारण्यास किंवा उपचारास टाळाटाळ
- सरकारकडून पैसे मिळण्यास उशीर होत असल्याचा आरोप
- सरकारने १९६ आजार (उदा. मोतीबिंदू, गँगरीन, प्रसूतीसंबंधी शस्त्रक्रिया) खासगी रुग्णालयांतून उपचारांच्या यादीतून वगळले.
ज्यामुळे सामान्य नागरिकांना शासकीय रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत आहे.
जागरूकतेचा अभाव
अनेक पात्र कुटुंबांना या योजनेची योग्य माहिती नसल्यामुळे ते कार्ड तयार करत नाहीत. परिणामी, उपचारांवेळी आर्थिक बोजा पडतो. या अंतर्गत सुमारे एक हजार ३५६ विविध आजार व शस्त्रक्रियांसाठी मोफत उपचार उपलब्ध आहेत. योजनेशी संलग्न शासकीय आणि खासगी रुग्णालयांत या योजनेतून उपचार घेता येतात.
आयुष्मान भारत कार्ड प्रत्येक व्यक्तीला स्वतःदेखील काढता येते. यासाठी महा-ई सेवा केंद्र, आशा सेविका, स्वस्त धान्य दुकानदार, योजना आरोग्य मित्र यांचे मार्गदर्शन घ्यावे. कार्ड असल्यास मंजुरी प्रक्रिया जलद होते. रुग्णाचा तांत्रिक त्रास कमी होतो आणि योजनेची अंमलबजावणी प्रभावी होते.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, वैद्यकीय अधिकारी महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.