आळेफाटा, ता. २ ः राजुरी (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्थापना २७ सप्टेंबर १८५१ला झाली. सुरुवातीला मोडी लिपीतील शिक्षणाने शाळेचा श्री गणेशा झाला. विद्यार्थ्यांसाठी प्रसन्न प्रफुल्लित आनंददायी वातावरण, भव्य सभागृह, पिण्याच्या पाण्यासाठी उत्तम सोय, सुंदर बोलक्या भिंतीवर सुंदर समाजप्रबोधनात्मक लिहिलेले पर्यावरण पूरक संदेश व शाळेने पालक ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने विकास साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.
सुरुवातीला या शाळेला स्वतःची इमारत उपलब्ध नव्हती मिळेल त्या जागेत शाळा भरवत सुरुवातीला एकच शाळा अस्तित्वात होती. परंतु विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेत शाळेचे २ शाळांत विभाजन करण्यात आले. १९५३ला मुलींसाठी व मुलांसाठी अशा २ स्वतंत्र शाळा अस्तित्वात आल्या. १९७५ पासून कौलारू इमारतीत भरणारी शाळा जीर्ण व नादुरुस्त झाल्याने प्रशस्त व सुसज्ज अशी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज शाळा उभी राहत आहे. नूतन इमारतीचे काम सध्या सुरू आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने भव्यदिव्य अशी इमारत उभी राहणार आहे. १० खोल्या प्रस्तावित असून अजून १० खोल्यांची आवश्यकता आहे.
शाळेतील उपक्रम
बाल दिंडी, ग्रंथ दिंडी वृक्षदिंडी, वृक्षारोपण, सीड बॉलद्वारे रोपण, वृक्षसंवर्धन, मतदार जागृती, प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया, नव साक्षरता अभियान, बालसंसद आदी उपक्रम राबविले जातात.
शाळेने मिळवलेले विविध पुरस्कार
-पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक पुरस्कार सन २०१८- १९ द्वितीय क्रमांक
-आमदार चषक पुरस्कार सन २०१९- २०
-प्रथम क्रमांकाचा स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त
वैशिष्टय
-आयएसओ मानांकित शाळा
-२०२४-२५ या वर्षात पंत प्रधान मा नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील पी एम श्री शाळा म्हणून भारत सरकारकडून निवड तालुक्यात तिसरा क्रमांक
-जागतिक स्तरावर आपला गुणवत्तेचा ठसा उमटविणारी शाळा
-सन २०२४ - २५मध्ये व्हिएतनाममध्ये जागतिक ॲबॅकस स्पर्धेत सहभागी होणारी व गुणवत्तेचे उत्कृष्ट प्रदर्शन करणारी शासकीय शाळा
डिजिटल लर्निंग
-डिजिटल बोर्ड व स्मार्ट टीव्हीद्वारे शिकविण्यास प्राधान्य
-सुसज्ज संगणक लॅब
-प्रत्येक वर्गात ई लर्निंग सुविधा
क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम
गुणवत्तेबरोबरच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही शाळा अग्रेसर आहे. शालेय क्रीडा महोत्सव व यशवंतराव चव्हाण क्रीडा स्पर्धा यामध्ये विद्यार्थी तालुका पातळीवर पारितोषिके प्राप्त केली आहेत. तालुका विज्ञान प्रदर्शन ॲबॅकस स्पर्धेत मंथन शिष्यवृत्ती, नवोदय आदी स्पर्धांत विद्यार्थ्यांनी अतुलनीय यश संपादन केले आहे.
शिक्षकांचा सहभाग
शाळेत एकूण १४ शिक्षक कार्यरत असून सर्व शिक्षक कल्पक, सृजनशील व विद्यार्थी निष्ठा बाळगणारे आहेत. शाळेतील अनेक शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले आहे. शाळेतील आजी व माजी अशा सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या जडण घडणीत बहुमूल्य योगदान दिले आहे. नवनवीन संकल्पना शिक्षक अमलात आणतात. विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी म्हणून शाळेतील मुख्याध्यापक सयाजी हाडवळे, प्रतिभा घंगाळे, नानाभाऊ कणसे, रेश्मा गुळवे, बाबाजी आहेर, नजमा पटेल, दत्तात्रय हाडवळे, वैशाली हाडवळे, वर्षा बांगर, शुभांगी शेलार, मधुकर उनवणे, कल्पना कणसे, अर्चना डुंबरे, सुरेखा औटी हे शिक्षक हे सातत्याने प्रयत्नशील असतात. तसेच शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास घंगाळे, माजी अध्यक्ष रूपाली औटी, नितीन औटी, शाळा
व्यवस्थापन समितीचे सदस्य, सर्व गावातील संस्था त्यांचे आजी-माजी पदाधिकारी व माजी विद्यार्थी सातत्याने परिश्रम घेतात. जुन्नर तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पट असलेली व उत्कृष्ट गुणवता असलेली आदर्श शाळा आहे.
भविष्यातील योजना
-आंतरराष्ट्रीय शाळांशी विद्यार्थी जोडणे
-परकीय भाषा शिक्षण सुरू करणे
-तंत्रज्ञानाच्या सर्व सुविधा उभ्या करणे
७५४६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.