पुणे, ता. १३ : जिल्ह्यातील वाढत्या भारनियमनाच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी सहा ते १० या वेळेत होणारा वीजपुरवठा खंडित करणे टाळा, अशी स्पष्ट सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.
जिल्हा परिषदेत सोमवारी (ता.१३) झालेल्या बैठकीत सर्वसामान्यांसाठी विविध उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. यावेळी जगदाळे बोलत होते.
गॅस पुरवठ्यातील अनियमिततेमुळे नागरिकांकडून इंडक्शन शेगडीचा वाढलेला वापर आणि उष्णतेमुळे शेतकऱ्यांकडून सायंकाळच्या वेळेत पिकांना पाणी देण्याची गरज लक्षात घेऊन या वेळेत अखंडित वीजपुरवठ्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले. प्रत्येक भागातील स्थानिक परिस्थितीनुसार भारनियमन वेळापत्रकात बदल करण्यास सांगण्यात आले आहे. रोहित्र संदर्भातील प्रस्ताव व सर्वेक्षण तातडीने पूर्ण करून आवश्यक दुरुस्ती व उभारणी वेळेत करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, पाणीपुरवठा योजनांच्या थकीत देयकांमुळे वीजपुरवठा खंडित करू नये, तसेच कोणतीही दंडात्मक कारवाई टाळावी, असेही स्पष्ट करण्यात आले. या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांचे व शेतीचे नुकसान टाळता येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. वीजपुरवठा अधिक सुसूत्र करण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.