पुणे

राज्यात ८९८ लाख क्विंटल साखर उत्पादन

CD

पुणे, ता. १७ : राज्यातील साखर गाळप हंगामाला १०८ दिवस पूर्ण झाले असून, आतापर्यंत २० साखर कारखान्यांनी हंगाम आटोपला आहे. राज्यातील २१० कारखान्यांमध्ये आतापर्यंत ९६० लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून, त्यातून ८९८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
यावर्षी हंगामादरम्यान पावसाचा व्यत्यय न आल्याने गाळप प्रक्रियेला अडथळा निर्माण झाला नाही. परिणामी, गाळपाचा वेग चांगला राहिला. आगामी काही दिवसांत कारखाने बंद होण्याचा वेग वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आतापर्यंत राज्यातील कारखान्यांनी ९६० लाख ७९ हजार ४७ टन उसाचे गाळप केले असून, सरासरी ९.२ टक्के उताऱ्यानुसार ८९८ लाख ४९ हजार ८९४ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. आतापर्यंत सर्वाधिक सहा साखर कारखाने सोलापूर; तर सातारा जिल्ह्यातील पाच कारखान्यांचा हंगाम बंद झाला आहे. दरम्यान, काही भागांत उसाला तुरे आल्याने उसाच्या वजनात घट झाल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

सहकारी कारखाने आघाडीवर
राज्यातील साखर गाळप हंगामाला १ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून, आतापर्यंतच्या कालावधीत सहकारी साखर कारखान्यांची चांगली कामगिरी दिसून आली आहे. हंगाम घेत असलेल्या कारखान्यांमध्ये खासगी कारखान्यांची संख्या अधिक असली, तरी गाळप, उत्पादन आणि उताऱ्याच्या बाबतीत सहकारी कारखाने आघाडीवर राहिले आहेत.

दृष्टिक्षेपात...
सहकारी कारखान्यांचे साखरेचे उत्पादन- ४ कोटी ८० लाख ३५ हजार ५ क्विंटल
खासगी कारखान्यांचे साखरेचे उत्पादन- ४ कोटी १८ लाख १४ हजार ८८९ क्विंटल
एकूण साखरेचे उत्पादन- ८ कोटी ९८ लाख ४९ हजार ८९४ क्विंटल
सहकारी कारखान्यांचे ऊस गाळप- ४ कोटी ८७ लाख ४५ हजार ७८७ टन
खासगी कारखान्यांचे ऊस गाळप- ४ कोटी ७३ लाख ३३ हजार ८५९ टन
एकूण उसाचे गाळप- ९ कोटी ६० लाख ७९ हजार ४७ टन

हंगाम संपलेल्या कारखान्यांची जिल्हानिहाय संख्या
सांगली- २
अहिल्यानगर- २
नाशिक- २
कोल्हापूर- ३
सातारा- ५
सोलापूर- ६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे पालिकेच्या नगर अभियंत्याच्या वाहनाचा चालक मद्यधुंद अवस्थेत पकडला; सरकारी वाहनात मद्यपानाचा प्रकार उघड; Video Viral

Imran Khan यांच्याशी जेलमध्ये नीट वागा! गावसकर, कपिल देवसह 'या' दिग्गज क्रिकेटर्सचं पाकिस्तानी सरकारला पत्र...

Ajit Pawar Plane Crash: ''ब्लॅक बॉक्सवर आगीचा दुष्परिणाम'', बारामती विमान अपघाताबाबत AAIB कडून स्पष्टीकरण

JEE Main Exam Result : जेईई मेनच्या पहिल्या सत्रातील परीक्षेचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील माधव विराडिया अव्वल

Latest Marathi News Live Update : अमरावतीत लहान मुलांना पळवन्याच्या संशयावरून एकाला मारहाण

SCROLL FOR NEXT