पुणे

एकल महिलांसाठी पुन्हा शिबिरे

CD

पुणे, ता. २१ : जिल्ह्यातील एकल महिलांना शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पुन्हा एकदा विशेष शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. आचारसंहितेमुळे काही काळ थांबलेली ही प्रक्रिया आता जोमाने सुरू करण्यात येणार असून, प्रत्येक तालुक्यात शिबिरे घेऊन एकल महिलांपर्यंत योजनांची माहिती आणि प्रत्यक्ष लाभ पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे.
राज्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीने एकल महिलांची स्वतंत्र माहिती संकलित करून सर्वेक्षण राबविण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून महिला व बालकल्याण विभागामार्फत ‘माझे अस्तित्व’ हा विशेष प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून एकल महिलांचे सबलीकरण करून त्यांना शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून यापूर्वी विविध ठिकाणी ८७ शिबिरांचे आयोजन केले होते. या शिबिरांद्वारे २४ हजार ४०३ एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात आला. महिला व बालकल्याण विभागाच्या पुढाकारातून आयोजित या शिबिरांमध्ये आरोग्य, कृषी, सामाजिक सुरक्षा, स्वयंसहाय्यता गट आदी विविध योजनांची माहिती देऊन तत्काळ नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठीही शिबिरांच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेने जिल्हाभरात एकल महिलांचे व्यापक सर्वेक्षण हाती घेतले होते. या सर्वेक्षणात एक लाख नऊ हजार एकल महिलांची नोंद झाली. याशिवाय २८ हजार ७६१ महिलांना आरोग्य तपासणी व मोफत उपचारांची गरज असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा शिबिरांचे आयोजन करण्याचे निश्चित केले आहे.


एकल महिलांसाठी पुन्हा एकदा काही दिवसामध्येच शिबिरांचे आयोजनाला सुरुवात करण्यात येणार आहे. एकल महिलांसाठी हे शिबिरे फायदेशीर ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय यापूर्वी झालेल्या शिबिरांचा अभ्यास करून आणखी काय बदल करता येईल, याबाबतही विचार केला जाणार आहे.
- आनंद खंडागळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

“त्यांच्यासोबत काम मास्टरक्लाससारखं वाटायचं" अक्षय कुमारने दिला असरानी यांच्या आठवणींना उजाळा ; भूतबंगला सिनेमात केलं अखेरचं काम

शुक्राच्या वृषभ राशीतील संक्रमणामुळे तयार होतोय पंचमहापुरुष राजयोग ! कोणत्या राशींना होणार फायदा घ्या जाणून

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT