पुणे

नृत्य, पोवाड्याच्या सादरीकरणातून हातवे खुर्दला शिवकाल जीवंत

CD

नसरापूर, ता. २५ : हातवे खुर्द (ता. भोर) येथील शिवजयंती सोहळा मिरवणूक, विद्युत रोषणाई आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या रेलचेलीमुळे लक्षवेधी ठरला. बाल मावळ्यांनी नृत्य, पोवाडे, भाषणांच्या सादरीकरणातून शिवकाल जीवंत केला. शिवरायांच्या जयघोषाने शिवभक्तांनी आसमंत दणाणून सोडला होता. यामुळे अवघे गाव शिवमय झाले होते.
किल्ले रोहिडेश्वर येथून शिवज्योतीचे आगमन झाल्यानंतर काढलेल्या भव्य मिरवणुकीत अबालवृद्ध सहभागी झाले होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मिरवणुकीनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
कार्यक्रमास उपस्थित राहून जिल्हा परिषद सदस्य विक्रम खुटवड, पंचायत समिती सदस्या तृप्ती खुटवड, पंचायत समिती सदस्य विशाल कोंडे आदींनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष भानुदास खुटवड, पोलिस पाटील विजय खुटवड, सरपंच संगीता खुटवड, उपसरपंच विकास खुटवड, नथू खुटवड तसेच हातवे पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती तसेच हातवे ग्रामस्थांनी शिवजयंती महोत्सवाचे यशस्वीपणे नियोजन केले होते. दत्तात्रेय खुटवड यांनी सूत्रसंचालन तर ॲड. सागर खुटवड यांनी आभार मानले.

98849

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनला संधी दिली जाणार का? भारतीय प्रशिक्षकाचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, आमचे दोन्ही ओपनर डावखुरे आहेत...

Sangli Accused :पलूसमध्ये फसवणूक प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; चारचाकी व शेअर मार्केट घोटाळ्यात दोघे ताब्यात

Illegal Cattle : कुपवाडमध्ये कत्तलीसाठी जनावरांची अमानुष वाहतूक; पोलिसांची धडक कारवाई, पाच जणांवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या वणीत आलिशान दुमजली घरात बनावटी दारू कारखाना,राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड

मी खचले होते... 'कमळी' मधील अन्नपूर्णा आजींवर एका कारणामुळे झालेली टीका; म्हणाल्या, 'माझ्यात कमी...'

SCROLL FOR NEXT