पुणे

डिजिटल पाटीच्या चमत्काराने वाढले कर संकलन

CD

नरेंद्र साठे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २५ : दारावरची एक छोटी डिजिटल पाटी... त्यावर छापलेला क्यूआर कोड अन्‌ मोबाइलवरील एक स्कॅन... एवढ्याशा बदलाने भोरमधील दोन गावांची करसंकलनाच्या वाढीचा आलेख उंचावला आहे. शिंदेवाडीत (ता.भोर) पाच वर्षांत सुमारे १५६ टक्के वाढ झाली. कासुर्डीत ही वाढ जवळपास हजार टक्क्यांपर्यंत पोहोचली. या दोन गावांचा पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात झाली आहे. त्यात भोर तालुका कर संकलनासाठी शंभर टक्के क्यूआर कोड करण्याच्या उंबरठ्यावर आहे.

घराच्या दारावर लावलेल्या डिजिटल पाटीवरील क्यूआर कोड स्कॅन करून मिळकत कर भरण्याची सुविधा सुरू केल्यानंतर भोर तालुक्यातील शिंदेवाडी आणि कासुर्डी ग्रामपंचायतींच्या करसंकलनात वाढ झाली आहे. शिंदेवाडी ग्रामपंचायतीचे २०२१-२२ मधील करसंकलन २७ लाख ४० हजार ७६९ रुपये होते. ते २०२५-२६ मध्ये वाढून ७० लाख २९ हजार १८२ रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच पाच वर्षांत ४२ लाख ८८ हजार रुपयांची वाढ झाली. कासुर्डी ग्रामपंचायतीत अधिक प्रभावीपणे वापर झाला आहे. २०२१-२२ मध्ये अवघे एक लाख तीन हजार ४८० रुपये असलेले करसंकलन २०२५-२६ मध्ये १० लाख ९४ हजार ८९३ रुपयांवर पोहोचले आहे. ग्रामीण भागात पूर्वी कर भरण्यासाठी ग्रामपंचायतीत जावे लागत होते. मात्र आता ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जावे लागत नाही.


कोड स्कॅन करताच मिळते ही माहिती
- मालमत्ता क्रमांक, मालकाचे नाव, भोगवटाधारकाची माहिती
- घराचे क्षेत्रफळ, मागील कर पावत्या,
- थकीत रक्कम आदी तपशील
- लिंकवरून थेट ऑनलाइन भरणा शक्य
- तत्काळ पावतीही डाऊनलोड करता येते.


भोर तालुका ठरणार पहिला
शिंदेवाडी, कासुर्डी या गावांच्या पावलावर पाऊल ठेवत भोर तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनीही करसंकलनासाठी क्यूआर कोड प्रणाली स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण तालुका शंभर टक्के क्यूआरआधारित करसंकलन करणारा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

घरातील पती, पत्नीचे नाव, घर क्रमांक आणि क्यूआर कोड असलेली पाटी तयार करण्यात आली. दोन्ही गावांमध्ये ही संकल्पना राबविण्यात आली. कर संकलनासोबतच इतर सात दाखलेही ऑनलाइन देण्यास सुरुवात केली आहे. जनजागृती आणि क्यूरआर कोड दोन्हीमुळे करसंकलनात मोठी वाढ झाली आहे.
- नवनाथ झोळ, ग्रामसेवक


शिंदेवाडी
कुटुंब संख्या -- ४६१
लोकसंख्या -- २,०५४

मागील पाच वर्षांतील करसंकलन
२०२१-२०२२................२७,४०,७६९
२०२२-२०२३................५७,४७,८८८
२०२३-२०२४................३९,४०,५८३
२०२४-२०२५................४३,१७,४८३
२०२५-२०२६................७०,२९,१८२

कासुर्डी
कुटुंब संख्या -- १६४
लोकसंख्या -- ८५२

२०२१-२०२२................१,०३,४८०
२०२२-२०२३................१,५७,०२०
२०२३-२०२४................३,०७,८९७
२०२४-२०२५................३,३१,१३७
२०२५-२०२६................१०,९४,८९३


शिंदेवाडी आणि कासुर्डीच्या धर्तीवर जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये वर्षभरात शंभर टक्के क्यूआर कोड बसविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. क्यूआर प्रणाली ही केवळ करसंकलनापुरती मर्यादित नाही; या माध्यमातून सात विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. नागरिकांना विविध दाखल्यांसाठी अर्जही थेट मोबाईलवरून करता येणार आहे.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: चालत्या ट्रेनमधून केसांना धरत तरुणीला बाहेर ओढलं नंतर...; महिलेचं धक्कादायक कृत्य, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ समोर

SL vs NZ, T20 WC: श्रीलंकेच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी, न्यूझीलंडच्या फलंदाजांची हाराकिरी! पाकिस्तानच्या ताफ्यात आनंद

तीन वेळा डेडलाईन… तरीही योजना कागदावरच का? 'झिरो प्रिस्क्रिप्शन’चा अर्थसंकल्पात स्पष्ट उल्लेख नाही!

Google Search : फेब्रुवारी महिन्यात सगळ्यात जास्त बघण्यात आले 'हे' 5 व्हिडिओ, गुगल सर्च ट्रेंड डेटामुळे जगभर खळबळ

Latest Marathi News Live Update : कांदा उत्पादकांचा संताप तीव्र

SCROLL FOR NEXT