पुणे

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग

CD

पुणे, ता. २८ : जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांसाठी ९ मार्चला निवडणुका होणार असल्याने जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे
जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या १४६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक ९० जागांवर विजय मिळविला आहे. भाजपचे २८ सदस्य विजयी झाले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने १२, शिवसेनेने १०, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने चार तर दोन अपक्ष सदस्य निवडून आले आहेत. १३ पैकी ८ पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून त्यांच्या पक्षाचे सभापती-उपसभापती होणार आहे. आंबेगाव, शिरूर, मावळ, मुळशी, हवेली, पुरंदर, वेल्हे, बारामती आणि इंदापूर पंचायत समितींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे या ठिकाणी सभापती व उपसभापती पदांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील. मात्र, जुन्नर, खेड, दौंड आणि भोर येथील चित्र रंगतदार आहे. जुन्नरमध्ये शिवसेना आघाडीवर असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसही मजबूत स्थितीत आहे. भोरमध्ये राष्ट्रवादी व भाजपचे समसमान सदस्य असल्याने तेथे राजकीय समीकरणे निर्णायक ठरणार आहेत. ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार, २० मार्चपूर्वी पहिली सभा घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी १३ उपजिल्हाधिकाऱ्यांची पीठासन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. प्रशासनानेही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षपदाकडे लक्ष कायम
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १७ मार्चला ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित आहे, त्यामुळे मोठी चुरस पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ७३ पैकी ५१ गटांमध्ये विजय मिळवला आहे. मात्र, पक्षांतर्गत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अंतर्गत चुरस वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

Maharashtra GAIL Project: आता वाऱ्यापासून वीज तयार होणार! गेल महाराष्ट्रात मेगा प्रकल्प उभारणार; पवनऊर्जा विस्ताराला बूस्ट मिळणार

Ajit Pawar, DGCA Report आला समोर, आदिती तटकरे थेट बोलल्या...

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT