पुणे

बारा कारखान्यांची धुराडी बंद

CD

पुणे, ता. २८ : यंदाच्या चालू साखर गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. पुणे विभागातील सातारा आणि पुणे जिल्ह्यांमधील एकूण १२ साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. यामध्ये जिल्ह्यातील चार कारखान्यांचा समावेश आहे. उर्वरित कारखान्यांकडूनही गाळप पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील काही दिवसांत बहुतांश कारखाने हंगामाची सांगता करतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील साखरेचा सरासरी उतारा ९.६९ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

नोव्हेंबर महिन्यात सुरू झालेला गाळप हंगाम यंदा तुलनेने जलद गतीने पार पडला. उपलब्ध उसाचा पुरवठा, हवामानातील अनुकूल परिस्थिती आणि कारखान्यांची कार्यक्षमता यामुळे गाळप प्रक्रियेला वेग आला. पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत एक कोटी १२ लाख ९७ हजार टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून, त्यातून एक कोटी नऊ लाख ५१ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. पुणे विभाग साखर गाळप आणि उत्पादनाच्या बाबतीत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. विभागामध्ये सरासरी ९.७५ टक्के साखरेचा उतारा मिळाला असून, त्याआधारे २०४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यातील एकूण १५ कारखान्यांपैकी ९ सहकारी तर ६ खासगी कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. सहकारी कारखान्यांना सरासरी १०.६२ टक्के निव्वळ साखर उतारा मिळाला असून, खासगी कारखान्यांना ८.३५ टक्के उतारा मिळाला आहे. त्यामुळे सहकारी क्षेत्राची कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील चार कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. जातेगाव येथील व्यंकटेश कृपा शुगर मिल्स हा खासगी कारखाना, मुळशी तालुक्यातील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखाना तसेच इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना या सहकारी कारखान्यांनी गाळप हंगामाची सांगता केली आहे. हंगामाच्या अखेरीस उर्वरित कारखान्यांकडूनही गाळप पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील काही दिवसांत बहुतांश कारखाने बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूण उत्पादन आणि उताऱ्याच्या दृष्टीने पुणे विभागाने यंदाच्या हंगामात समाधानकारक कामगिरी केली असून, सहकारी कारखान्यांची आघाडी कायम राहिल्याचे चित्र दिसून येत आहे.


सहकारी कारखाने............९
गाळप............६६,८२,९४५ टन
साखर उत्पादन............७०,९८,६१५ क्विंटल
उतारा............१०.६२ टक्के


खासगी कारखाने............६
गाळप............४६,१४,३४६ टन
साखर उत्पादन............३८,५३,३४३ क्विंटल
उतारा............८.३५ टक्के


कारखाना............गाळप (टन)............साखर (क्विंटल)
दौंड शुगर............१५,०२,१६०............११,९२,८००
व्यंकटेश कृपा............४,६३,९८६............३,६९,०००
बारामती ॲग्रो............१७,४६,९३५............१५,१७,९४५
माळेगाव............१०,३३,९९०............११,८२,७००
नीरा-भीमा............५,२५,६५७............४,२२,४४०
सोमेश्वर............११,०७,०४६............१२,९४,०००
पराग ॲग्रो............४,४२,००२............४,३५,२८३
श्रीनाथ ............४,२८,५२५............३,१३,४६५
संत तुकाराम............३,००,९७४............३,०९,६७५
विघ्नहर............८,४०,१४४............८,९०,२००
छत्रपती............७,५६,२८६............८,५९,४००
भिमा पाटस............६,५०,०८३............६,६४,३००
अनुराज............३०,७३७............२४,८५०
कर्मयोगी शंकराव पाटील............६,०३,५१५............५,७४,९००
भीमाशंकर............८,६५,२५०............क़’९,०१,०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Cancel : आखाताकडे जाणारी तीन विमाने पुण्यातून रद्द

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वे मुंबई- मडगांव/हटिया आणि पुणे -दानापूर दरम्यान १८ अतिरिक्त होळी विशेष चालवणार

CIDCO Lottery: नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिडकोने गृहनिर्माण योजनेची अंतिम मुदत; आता शेवटची तारीख काय?

Horoscope : नवा महिना, नवा राजयोग! उद्या 1 मार्चपासून पुढचे 4 दिवस 'या' 4 राशीच्या लोकांसाठी लकी, होणार धनलाभ

Indian Embassy in Kuwait Issues Urgent Advisory : युद्ध परिस्थितीमुळे कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना, म्हटले...

SCROLL FOR NEXT