पुणे

रिंग रोड प्रकल्पाला अखेर गती

CD

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ५ ः पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) महत्त्वाकांक्षी इनर रिंग रोड प्रकल्पाला अखेर गती मिळत आहे. त्यासाठी २०० एकर भू-संपादनाचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले असून जमिनींची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. ११ गावांतील जमिनींचे भरपाई दर निश्चित करण्यात आले असून तीन गावांतील भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण, मोजमाप आणि भरपाईचा सविस्तर अहवाल तयार करून तो पीएमआरडीएकडे सादर केला आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर आणि आसपासच्या भागातील वाहतूक कोंडीचा त्रास कमी व्हावा, यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यात उड्डाणपूल, रेल्वे उड्डाणपूल, भुयारी मार्ग तसेच मोठे पूल उभारण्याची तरतूद आहे.

--------
आकडे बोलतात

८३.१२ किमी ः लांबी
६५ मीटर ः रुंदी
४२ ः संपर्क रस्ते
१४ हजार २०० कोटी रुपये ः अपेक्षित खर्चाला प्रशासकीय मान्यता
१ हजार ९०० हेक्टर ः प्रकल्पासाठी लागणारी जमीन


प्रकल्पाची सद्यःस्थिती
भाग २
१. नाशिक रस्ता ते सातारा रस्ता (४२.३० किमी)
२. सातारा रस्ता ते परंदवाडी (४०.८२ किमी)
- जिल्हाधिकारी कार्यालयाला ४२.३० किलोमीटर लांबीच्या भू-संपादनाचे प्रस्ताव
- ४०.८२ किमीच्या भू-संपादनाचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु
- पहिला टप्पा - सोलू ते पुणे-अहिल्यानगर महामार्ग (१०.४० किमी)
- सोलू ते वडगाव शिंदे या ४.७० किमीचे काम पीएमआरडीए करणार
- लोहगाव ते पुणे-अहिल्यानगर महामार्ग या ५.७० किमीचे काम पुणे महापालिका करणार
- सोलू, निरगुडी आणि वडगाव शिंदे गावांसाठी भरपाई दर अंतिम, भूसंपादन लवकरच
-----------
२८ वर्षांनंतरही कागदावरच !
पुणे जिल्हा प्रादेशिक योजनेत २५ नोव्हेंबर १९९७ रोजी ९० मीटर रुंदीचा रिंगरोड प्रस्तावित करण्यात आला. मध्यंतरी तो ११० मीटर रूदींचा करण्यात आला, परंतु या रिंगरोडपासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावरून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा (एमएसआरडीसी) रिंगरोडही तयार केला जात आहे. मात्र, काही ठिकाणी एकाच गावातून दोन्ही रिंगरोड जात असल्यामुळे नागरिकांचा विरोध लक्षात घेऊन पीएमआरडीएने रिंगरोडची रुंदी कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ही रुंदी ६५ मीटर रुंदी करून तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे २१ जून २०२१ मध्ये पाठविला. त्याला राज्य सरकारने १८ नोव्हेंबर २०२१ मध्ये मान्यता दिली. थोडक्यात असे की २८ वर्षांचा कालावधी उलटूनही प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही.
----------
५ टप्पे - सोलू ते परंदवाडी (८३.१२ किमी)
१. पुणे-नाशिक महामार्ग (सोलू) ते पुणे-अहिल्यानगर महामार्ग (१०.४० किमी)
२. पुणे-अहिल्यानगर ते पुणे-सोलापूर (११.०५ किमी)
३. पुणे-सोलापूर महामार्ग ते पुणे-सातारा महामार्ग (२०.८५ किमी)
४. पुणे-सातारा महामार्ग ते पुणे-पौड रस्ता (१४.२० किमी)
५. पौड रस्ता ते परंदवाडी (२६.६२ किमी)
----------
रिंगरोड प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात आलेली आहे. ४२ किमी लांबीच्या रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनींची सयुंक्त मोजणी पूर्ण झाली आहे. जमीन संपादन प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे.
- डॉ. अभिजित चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए, पुणे
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar : 'दादांनंतरची ही पहिलीच निवडणूक, त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्याची बारामतीकरांना संधी'; पोटनिवडणुकीबाबत काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?

Numerology : फारच भोळे असतात 'या' २ मुलांकाचे लोक! प्रेमात सतत खातात धोका; कुणीही सहज फसवून जातं, तरीही आयुष्यभर राहतात निरागस

Nanded Gangwar : गँगवॉरने नांदेड हादरले, भर रस्त्यावर तरुण नेत्याची निर्घृण हत्या; तीन दिवसांत पाच खून

Alphonso Mango: हापूस पोहोचला 'युके'त, हवाई खर्चात दुप्पट वाढ; डझनाला विक्रमी किंमत

Baramati By Election : सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज ; अजितदादांच्या आठवणीने डोळ्यांत तरळले अश्रू

SCROLL FOR NEXT