पुणे

जिल्हा परिषदेत जगदाळे पर्व

CD

पुणे, ता. १८ : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे दौंड तालुक्यातील सदस्य वीरधवल जगदाळे यांची बिनविरोध निवड झाली. तर, सलग दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये विवेक वळसे पाटील यांना उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील १ हजार ४५९ दिवसांनी प्रशासक कालावधी संपुष्टात आला.
पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ७३पैकी ५१ सदस्य निवडून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले. परिणामी अध्यक्ष व उपाध्यक्षपदांवर राष्ट्रवादीचे पदाधिकारी विराजमान होणार, हे स्पष्ट झाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हाती देण्यात आली असून, जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे अधिकारही त्यांच्याकडे सोपविण्यात आले होते. बुधवारी शिवाजीनगर येथील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक पार पडली. त्यात सुनेत्रा पवार यांच्याकडून पाठविण्यात आलेला बंद लिफाफा उघडण्यात आला. त्यानंतर अध्यक्षपदासाठी वीरधवल जगदाळे, तर उपाध्यक्षपदासाठी विवेक वळसे पाटील यांची नावे जाहीर करण्यात आली.
दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून वीरधवल जगदाळे यांनी, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून गटनेते ॲड. विजयसिंह शिंदे यांनी उमेदवारी सादर केली. उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून विवेक वळसे पाटील यांनी, तर शिवसेनेकडून मंगेश काकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी तीन वाजता झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्व अर्जांची छाननी करण्यात केल्यानंतर सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेची माहिती देत अर्ज माघारी घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी जाहीर केला. अध्यक्षपदासाठी शिंदे आणि उपाध्यक्षपदासाठीचा काकडे यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यानंतर अध्यक्षपदासाठी जगदाळे आणि उपाध्यक्षपदासाठी वळसे पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी जाहीर केले.


बंगल्यावरची बैठक झाली रद्द
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होणार होती. याची कुणकुण विरोधी पक्षाच्या सदस्यांना कळताच त्यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाकडे याबाबत विरोध दर्शविला. त्यानंतर पक्षाची बैठक पक्ष कार्यालयात झाली. यापूर्वी अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी बंगल्यावर बैठका झाल्या आहेत, पण त्यावेळी प्रशासक कालावधी नव्हता. यावेळी प्रशासक कालावधी असल्याने बंगला अध्यक्षांकडे नसल्याचा मुद्दा विरोधी पक्षातील काही सदस्यांनी निदर्शनास आणून दिला.


भाजपने शब्द पाळला
भाजपने जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अर्ज भरला नाही. याबाबत पक्षाच्या वरिष्ठांशी जिल्ह्यातील नेत्यांनी विचारणा केली होती, मात्र अर्ज भरू नका, असे सांगण्यात आल्याने भाजपने वरिष्ठांचा शब्द पाळला.

अजितदादा असते तर त्यांचा आनंद द्विगुणित झाला असता. दादा दादाच होते. ते इतक्या लवकर जातील, हे कोणालाच वाटले नव्हते. दादांनी पुणे जिल्हा परिषदेला सर्वसामान्यांची संस्था म्हणून देशभरात ओळख करून दिली. दादा अनेकदा म्हणायचे, ‘रडत बसू नका, उठा आणि कामाला लागा.’ नवीन सदस्यांना आवाहन आहे की, आपण थांबायचे नाही; दुप्पट जोमाने कामाला करायचे आहे.
- वीरधवल जगदाळे, अध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे

अजित पवार यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली असून, ती कोणीच भरून काढू शकत नाही. आपण दादांनी निवडलेले शेवटचे सदस्य आहोत. त्याची जाणीव ठेवून अधिक काम करूया.
- विवेक वळसे पाटील, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनधिकृत गॅस गोदामातून सिलिंडरची विक्री, पुरवठा विभागाचा छापा; ५७ सिलिंडर केले जप्त, कुठं झाली कारवाई?

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

मी काही बोलत नाही, याचा अर्थ...! गौतम गंभीर संतापला; रोहित, विराटचा अप्रत्यक्ष उल्लेख, भारताच्या 'कसोटी' कामगिरीवर केले भाष्य

Baramati News : बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम; राज्य शासनाने घेतला निर्णय

मी त्याचा बाप आहे... व्हायरल व्हिडीओमुळे होणाऱ्या टीकेवरून आस्ताद काळेचे वडील संतापले; म्हणाले- माजोरडा आहे म्हणता मग...

SCROLL FOR NEXT